ऑरेंज कॅप, पर्पल कॅप जिंकणाऱ्यांना आणि ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईला किती पैसे मिळाले?

शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या आयपीएलच्या फायनल सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्सला एका रनने जिंकून इतिहास घडवला आहे. मुंबई इंडियन्स या विजयाबरोबर सगळ्यात जास्त वेळा (४ वेळा) IPLचं जेतेपद पटकावणारी टीम बनली आहे.

मुंबई इंडियन्सने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चेन्नईसमोर १५० धावांचं लक्ष्य ठेवलं. शेवटपर्यंत सामन्यात कोण बाजी मारेल हे कळत नव्हतं. सामना कधी चेन्नईच्या बाजूने झुकायचा तर कधी मुंबईच्या बाजूने पण शेवटी मुंबई इंडियन्सने बाजी मारली. शेवटच्या बॉलवर चेन्नईला दोन धावांची गरज होती. बॉल मुंबईचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या हातात होता. त्याने शेवटचा बॉल टाकला आणि शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेतली. आणि आयपीएल जेतेपद मुंबईच्या नावावर केले.

चेन्नईकडून शेन वॅटसनने सर्वाधिक ८० धावा केल्या. वॅटसनला या सामन्यात तीन जीवनदान मिळाले. तरीही तो चेन्नईला विजय मिळवून देऊ शकला नाही.

आयपीएल जिंकणाऱ्या टीमला आणि ऑरेंज कॅप, पर्पल कॅप जिंकणाऱ्यांना किती पैसे मिळाले-

IPL जिंकणाऱ्या टीमला एकूण २० कोटी रुपये मिळाले. नियमांनुसार या रकमेचा अर्धा भाग टीम फ्रेंचायझीला मिळतो तर अर्धा हिस्सा खेळांडूमध्ये वाटला जातो. याशिवाय उपविजेत्या टीमला १२.५ कोटी रुपये मिळतात.

Emerging Player of the Season-

या स्पर्धेदरम्यान Emerging Player म्हणून ऐकलं असेल. तर Emerging Player(सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू) ला एक ट्रॉफी दिली जाते आणि १० लाख रुपयेही. या खेळाडूची निवड स्पर्धेतील कमेंटेटर्स तसंच IPLच्या वेबसाईट आणि अॅपवर लोकांनी दिलेल्या मतांवरून केली जाते. यंदा कोलकाता नाईट रायडर्सच्या शुभमन गिलला हा पुरस्कार मिळाला आहे.

ऑरेंज कॅप विजेता-

या सिजनमध्ये कमी सामने खेळूनही ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान सनरायजर्स हैद्राबादच्या डेव्हिड वॉर्नरला मिळाला आहे. त्याला सोबतच १० लाख रुपयांचं बक्षिस देखील मिळालं आहे. वॉर्नरने ६९.२० च्या सरासरीने ६९२ रन्स केले. त्याचा स्ट्राईक रेट १४३.८६ होता.

पर्पल कॅप विजेता-

स्पर्धेत सगळ्यात जास्त विकेटस घेऊन पर्पल कॅपजिंकण्याचा मान चेन्नई सुपरकिंग्सच्या इम्रान ताहीरला मिळाला. त्यालाही १० लाख रुपये रोख बक्षीस
म्हणून मिळाले.या हंगामात इम्रानने २६ विकेट घेतल्या.

Most Valuable Player-

र्धेत सर्वाधिक पॉइंटस मिळवणाऱ्या खेळाडूला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब दिला जातो. हे पॉइंट्स त्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर आधारित असतात – फोर, सिक्स, डॉट बॉल, कॅचेस, स्टंपिंग. या खेळाडूलाही १० लाख रुपयांचं बक्षीस दिलं जातं.

Perfect Catch of the Season-

स्पर्धेदरम्यान सगळ्यात भारी कॅच घेणाऱ्या खेळाडूला ‘परफेक्ट कॅच ऑफ द सिझन’चा अवॉर्ड दिला जातो. किरन पोलार्डने हा मान पटकावला. परफेक्ट कॅच घेणाऱ्या खेळाडूला देखील १० लाख रुपयांचं बक्षीस दिलं जातं. याची निवडही प्रेक्षकांच्या ऑनलाईन मतांमधून केली जाते.

Super Striker Of The Year-

IPL स्पर्धेत सगळ्यात जास्त स्ट्राइक रेट असणाऱ्या खेळाडूला एक लाख रुपये, एक SUV गाडी आणि ट्रॉफी दिली जाते. यंदा आंद्रे रसेलने Super Striker Of The Year बनण्याचा मान मिळवला.

फेअर प्ले अवॉर्ड-

विशेष खिलाडूवृत्ती दाखवणाऱ्या संघाला फेअर प्ले अवॉर्ड मिळतो. यंदा सनरायजर्स हैदराबादने हा मान पटकावला. त्यांना फक्त मान मिळतो, यामध्ये काही बक्षिस नसते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *