आयपीएल मधील चिअरगर्ल्स प्रत्येक मॅचला किती कमाई करतात ?

तुम्हाला जर वाटत असेल कायम हसरा चेहरा ठेवून रखरखत्या सुर्याखाली प्रेक्षकांच्या टोमण्यांना आणि चिडवण्याला तोंड देत नाचणं सोपं असतं, तर एक दिवस चिअरगर्ल्स बनून बघा. मैदानामध्ये खेळाडू आपला डंका वाजवत असताना या चिअरगर्ल्स मैदानाबाहेर प्रेक्षकांमध्ये उत्साह भरण्याचे काम करतात. मात्र आपण जेव्हा कमाईबद्दल बोलत असतो तेव्हा फक्त खेळाडूंबद्दल बोलतो, चिअरगर्ल्सबद्दल सहसा बोलत नाही. तर आज आपण जाणून घेऊया २०१९ मधील आयपीएल सामन्यांमधील चिअरगर्ल्सच्या कमाईबद्दल…

सर्वसाधारणपआयपीएल संघ आपल्या चिअरगर्ल्सना पर्यटक मॅचसाठी ६००० ते १२००० रु. सॅलरी देतात. संघ जिंकल्यास ३००० रु. बोनस देतात. पार्टी किंवा इतर कार्यक्रमात सहभागाबद्दल ७००० ते १२००० रु. दिले जातात. तसेच फोटोशूटसाठी ५००० रु. दिले जातात. आता आपण बघूया कुठल्या संघाच्या चिअरगर्ल्स किती कमाई करतात.

कोलकाता नाईट रायडर्स : शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्स टीम आपल्या संघाच्या फॅन्सला चिअर करण्याची सहसा संधी देत नसली तरी त्यांच्या चिअरगर्ल्स मात्र आयपीएल मधील इतर संघाच्या तुलनेत सर्वाधिक कमाई करतात.
प्रति मॅच मानधन – २०००० रु.
मॅच जिंकल्यास बोनस – ७००० रु.
वार्षिक कमाई – १२ लाख रु.

रॉयल चॅलेंजर बेंगलोर : विराट कोहली आणि ए.बी.डिव्हिलियर्स सारखे तडाखेबाज खेळाडूंमुळे रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या फॅन्स आणि चिअरगर्ल्सना सतत चिअर करण्याची संधी मिळते. आयपीएल मध्ये या संघाचे प्रदर्शन एवढे चांगले नसले तरी त्यांच्या चिअरगर्ल्स मात्र चांगली कमाई करतात.
प्रति मॅच मानधन – १७००० रु.
मॅच जिंकल्यास बोनस – ३५०० रु.
वार्षिक कमाई – ५.५ लाख रु.

मुंबई इंडियन्स : मुंबई इंडियन्स टीमला भाग्यशाली टीम म्हणता येईल, कारण आपल्या फॅन्सला अनेकदा चिअर करण्याची संधी त्यांनी दिली आहे. परंतु आश्चर्याची बाब ही आहे की, आयपीएल मधील सर्वात श्रीमंत फ्रॅन्चायजी असणारे मुकेश अंबानी आपल्या संघाच्या चिअरगर्ल्सना सरसरीच वेतन देतात.
प्रति मॅच मानधन – १७००० रु.
मॅच जिंकल्यास बोनस – ७००० रु.
वार्षिक कमाई – ८.५ लाख रु.

राजस्थान रॉयल्स : आपल्या हल्लाबोल गाण्यावर फॅन्सला चिअर करण्याची संधी देणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात फारसे आयकॉन खेळाडू नसतात. पण आयपीएल मध्ये राजस्थानच्या संघ कधी डार्क हॉर्स म्हणून पुढे येईल ते सांगता येत नाही.
प्रति मॅच मानधन – १२००० रु.
मॅच जिंकल्यास बोनस – उपलब्ध नाही.
वार्षिक कमाई – ३.५ लाख रु.

किंग्स इलेव्हन पंजाब : प्रीती झिंटाच्या उपस्थितीत पंजाबचा संघ आपल्या प्रदर्शनाने फॅन्सला चिअर करण्याची चांगलीच संधी देतो. आयपीएल मध्ये प्रतिअस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवणारा हा संघ आहे.
प्रति मॅच मानधन – १०००० रु.
मॅच जिंकल्यास बोनस – उपलब्ध नाही.
वार्षिक कमाई – ३ लाख रु.

सनरायझर्स हैद्राबाद : आयपीएलच्या सुरुवातीला सनरायझर्स हैद्राबाद संघाचा वारू चांगलाच उधळत होता. २०१६ साली अचानकपणे मुसंडी मारत त्यांनी विजेतेपद पटकावले होते. आयपीएल मध्ये आपल्या फॅन्सला मात्र चिअर करण्याची संधी संघाने नेहमी दिली आहे.
प्रति मॅच मानधन – १०००० रु.
मॅच जिंकल्यास बोनस – उपलब्ध नाही
वार्षिक कमाई – ३ लाख रु.

चेन्नई सुपर किंग्स : आयपीएल मधील सर्वाधिक सातत्य असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचे समर्थक संपूर्ण देशात आहेत. शांतपणे खेळून विरोधकांवर मात करणाऱ्या धोनीच्या संघाने आपल्या फॅन्सला नेहमीच चिअर करण्याची संधी दिली.
प्रति मॅच मानधन – १०००० रु.
मॅच जिंकल्यास बोनस – उपलब्ध नाही
वार्षिक कमाई – ३ लाख रु.

दिल्ली कॅपिटल्स : आयपीएल मधील डार्क हॉर्स असणारा दिल्लीचा संघ आयपीएल गुणतालिकेत फेरबदलाव करण्यात माहीर आहे. दिल्लीचे फॅन्स आपल्या संघाच्या प्रदर्शनाने खुश असतात तर त्यांच्या सुंदर चिअरगर्ल्सही फॅन्सचे चांगलेच मनोरंजन करतात.
प्रति मॅच मानधन – १०००० रु.
मॅच जिंकल्यास बोनस – उपलब्ध नाही
वार्षिक कमाई – ३ लाख रु.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *