चेहऱ्यावर कुठे आलेत पिंपल यावरुन समजतात आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी !

चेहऱ्यावर लाललाल पिंपल्स दिसले की आपण चिंतेत पडतो. मग हे पिंपल घालवण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या महागड्या क्रीम वापरुन बघतो. मात्र जिद्दी पिंपल्स काय जायचे नाव घेत नाहीत. यामागचे कारण म्हणजे आपण चुकीचे उपचार करत आहोत.

आपल्याला वाटते चेहऱ्यावर पिंपल्स तेव्हा येतात, जेव्हा आपण चेहरा व्यवस्थितरीत्या साफ करत नाही किंवा जेव्हा आपल्या त्वचेची छिद्र ब्लॉक होतात. ही तर कारणे आहेतच, पण त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित इतरही काही करणे आहेत.

चेहऱ्यावर कुठे आलेत पिंपल्सचा याचा असतो आरोग्यशी संबंध

आपल्या चेहऱ्यावर कुठे पिंपल्स आलेत यावरुन आरोग्याशी संबंधित काही लक्षणे सांगत असतात. अशा प्रकारे आजाराचा शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला “फेस मॅपिंग” असेही म्हणतात. पिंपल्स येण्यामागे आपण काय खातो, किती झोपतो, कोणत्या हवेत श्वास घेतो अशा गोष्टींचा प्रभाव असतो.

कपाळावर पिंपल्स येत असतील तर…

अति काळजी करण्याने किंवा पचनक्रियेत गडबड झाल्याने आपल्या कपाळावर पिंपल्स येतात. आपले केस वारंवार आपल्या कपाळाला चिकटतात. केसांना चिकटलेली धूळ आपल्या त्वचेला लागते, परिणामी पिंपल्स होतात. त्यासाठी आपण दररोज सात तासांची झोप घेणे आवश्यक आहे. तसेच भरपूर पाणी आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे.

गालांवर पिंपल्स येत असतील तर…

आपल्याला श्वसनक्रियेसंबंधित आजार असल्यास गालांच्या वरच्या भागात पिंपल्स येतात. आपल्या श्वसनसंस्थेत नाकापासून फुफ्फुसापर्यंत अवयव येतात. आपले दात योग्य पद्धतीने साफ नसतील तर गालांच्या खालच्या बाजूंवर पिंपल्स येतात. त्यासाठी आपल्या गालाच्या संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टी उदा.मोबाईल, उशांचे कव्हर वगैरे साफ ठेवत जा. घरात हवा स्वच्छ राहण्यासाठी झाडे लावा.

भुवयांच्या मध्यापासून नाकाशेजारच्या भागात पिंपल्स येत असतील तर…

आपल्याला एखादी गोष्टीची विशेषतः कुठल्या खाद्यपदार्थाची एलर्जी असेल किंवा आपल्या पोटात संसर्ग असल्यास भुवयांच्या मधील भृकुटी आणि नाकाशेजारच्या जागेत पिंपल्स येतात. यावर उपाय म्हणून आपल्या आहारातील दूध, दही, तूप, पनीर असे दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण कमी करायला हवे. सोबत हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात.

लिव्हर, किडनी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर नाकावर पिंपल्स येतात. शरीरातील हार्मोन्सच्या गडबडीमुळे नाकाशेजारच्या भागात पिंपल्स येतात. त्यासाठी आपण ओमेगा थ्री गोळ्यांचे सेवन करायला हवे. तसेच पूर्ण झोप घ्यायला हवी.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *