जेव्हा नेहरुंच्या आवडीची सिगारेट मागविण्यासाठी पाठवले होते विमान..

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एका बाजूने नरेंद्र मोदींकडून नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेस पक्षावर आरोपांच्या फैरी झडत असताना दुसऱ्या बाजूने काँग्रेसही मोदींवर तितक्याच ताकतीने आरोपांची राळ उठवत आहे. मध्यंतरी मोदींनी राजीव गांधींबद्दल आयएनएस विराटचा खाजगी वापर केल्याचा आरोप केला होता. परंतु त्यानंतर ऍडमिरल रामदास यांनी मोदींचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध केले होते. मात्र यावेळेस नेहरूंबद्दल एक वेगळाच विषय समोर आला आहे. पाहूया काय आहे प्रकरण…

मध्यप्रदेश गव्हर्नरच्या अधिकृत वेबसाईटवर नेहरूंबद्दलचा किस्सा

मध्यप्रदेश राजभवनच्या अधिकृत वेबसाईट governor.mp.gov.in च्या Anecdotes भागात देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी एक किस्सा देण्यात आला आहे. त्यात दिले आहे की, “जबलपूर येथे झालेल्या दंगलीवरून प्रधानमंत्री नेहरूंनी मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री के.एन.काटजू यांच्यावर टीका केली. त्यावेळी मध्यप्रदेशचे तत्कालीन राज्यपाल हरी विनायक पाटसकर यांनी जवाहरलाल नेहरु यांना पत्र लिहून कळवले की, कायदा व सुव्यवस्था राज्याच्या अखत्यारीतील विषय असल्याने केंद्राने त्यात हस्तक्षेप करू नये. संघराज्य व्यवस्थेत प्रधानमंत्री टीका करू शकत नाहीत.”

नेहरूंची भोपाळ भेट आणि भोपाळच्या राणीचे नेहरूंना मुक्कामाचे निमंत्रण

वेबसाईटवर पुढे दिले आहे की, “नेहरु ज्यावेळेस भोपाळला आले त्यावेळेस भोपाळच्या राणीने त्यांना त्यांच्या पॅलेसवर मुक्काम करण्यासाठी निमंत्रण दिले. नेहरूंनी ते निमंत्रण स्वीकारले. राज्यपाल पाटसकर यांनी नेहरूंना तात्काळ संपर्क केला आणि हा एक अधिकृत दौरा असल्याने त्यांना मुक्काम करण्यासाठी राजभवन हे एकमेव योग्य ठिकाण आहे असे सांगितले.” हरी विनायक पाटसकर हे १९५७ ते १९६५ पर्यंत मध्यप्रदेशचे राज्यपाल होते.

नेहरुंना आवडत होती “555” ब्रँडची सिगारेट

वेबसाईटवरील लेखात दावा करण्यात आला आहे की, “नेहरु राजभवनात मुक्कामी आले असताना तिथल्या स्टाफला समजले की नेहरुंच्या आवडीची “555” ब्रॅण्डची सिगारेट राजभवनात उपलब्ध नाही. नेहरु सामान्यपणे जेवणानंतर सिगारेट प्यायचे. याची माहिती मिळताच राजभवनाच्या कर्मचाऱ्यांनी नेहरुंच्या आवडीची सिगारेट आणण्यासाठी तिथल्या स्टाफने त्वरित एक विमान इंदौरला पाठवले, जिथे इंदौरच्या विमानतळावर अगोदरच सिगारेट पाकीट तयार ठेवण्यात आले होते.

आपणास हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *