मुंबई इंडियन्स मैदानात उतरवणार भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा हा ‘हुकुमी एक्का’!

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीममध्ये आज आयपीएलचा फायनल सामना हैदराबाद येथे होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी तोडीस तोड कामगिरी करत इथवर मजल मारली आहे. या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॅप्टन कून महेंद्रसिंग धोनी आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

यावर्षी आयपीएल जिंकणारा संघ इतिहास घडवणार आहे. कारण यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी तीन वेळा जेतेपदाचा मन मिळवला आहे. आयपीएलच्या 12व्या मोसमात जेतेपदाचा चषक उंचावणारा संघ हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जाणार आहे.

आज जो संघ बाजी मारेल त्याच्या नावावर सर्वाधिक जेतेपद नोंदवली जाणार आहेत. या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने ‘हुकुमी एक्का’ मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा भिडणार आहेत. चेन्नईने २०१० मध्ये मुंबईच्या डी वाय पाटिल स्टेडियमवर मुंबईला २२ धावांनी नमवून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१३ मध्ये मुंबईने कोलकाताच्या इडन गार्डन्सवर चेन्नईचा २३ धावांनी, तर २०१५ मध्ये इडन गार्डन्सवरच चेन्नईचा ४१ धावांनी पराभव केला. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो की चेन्नई जेतेपदाच्या शर्यतीत बरोबरी करतो याची उत्सुकता आहे.

चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक ८ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्यांदा फायनल खेळणार आहे. चेन्नईने ७ वेळा फायनल खेळून ३ जेतेपत मिळवले आहेत तर मुंबईने ४ पैकी ३ फायनल जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड असणार आहे. मुंबईने या सिजनमध्ये देखील चेन्नईला ३ सामन्यात धूळ चारली आहे.

वर्ल्डकप जिंकवून देणारा हा ‘हुकुमी एक्का’ मैदानात?

या सामन्यात मुंबई इंडियन्स युवराज सिंगला संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवीनं शनिवारी नेट्समध्ये कसून सरावही केला. युवराजला मुंबईने १ कोटी मूळ किंमत देऊन खरेदी केले आहे. पण त्याला खेळण्याच्या जास्त संधी मिळाल्या नाहीत. युवराजने एका सामन्यात ५३ धावांची तुफानी खेळी खेळली होती.

चेन्नईच्या संघात फिरकीपटूंचा भरणा आहे. त्यामुळे चेन्नईच्या फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी मुंबई युवीला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. युवराजला जास्त संधी न मिळाल्यामुळे आज तो संधी मिळाल्यास संधीचं सोनं करण्यास सज्ज असणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *