दोन्ही फोटो इंडोनेशिया मधील समुद्र किनार्या वरील आहे, दोन्हीतील फरक बघून मन सुन्न होणार..

इंडोनेशिया अनेक लोकासाठी पर्यटनाचे केंद्र आहे. तेथील वातावरण स्वच्छ समुद्र अनेकांचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतो. परंतु आता स्वरूप जरा वेगळेच दिसत आहे आणि हि गोष्ट सोशल मिडियावरून लक्षात आलेली आहे. तर झाले असे कि,

२०१८ पर्यंत हा समुद्र किनारा अगदी स्वच्छ आणि सुंदर होता. अनेक पर्यटक येथे भेट देण्याकरिता येत असे. Mary Fe आणि Jake Snow हे इन्स्टाग्राम वरील फेमस कपल आहे. अनेक देशात हे फिरत राहतात. मुळात ते travell blogger आहे ज्यामध्ये जगातील विविध जागेचा प्रवास करून तिथली माहिती देतात आणि फोटो, व्हिडीओ शेअर करतात.

२०१८ साली ते इंडोनेशिया येथील ह्या प्रसिद्ध गुलाबी समुद्र किनाऱ्यावर आले होते. त्यावेळेस हे बीच एवढे सुंदर आणि स्वच्छ होते कि तिथेच रहावे असे त्यांना वाटत होते. परंतु २०१९ मध्ये परत जेव्हा ते या बीचवर गेले तेव्हा त्यांचा डोळ्यावर विश्वास बसला नाही.

काय झाले या काळात ?

हा समुद्र किनारा संपूर्ण प्लास्टिक आणि कचरा याने भरून गेला होता. पाणी देखील प्रदूषित होते. स्वच्छता तिथे बाकी नव्हती त्यानंतर त्यांनी हि गोष्ट सोशल मिडीयावर अनेकांना कळवली. आणि २०१८ व २०१९ चा हा फोटो शेअर केला ज्यामध्ये फरक आपण आपल्या डोळ्याने बघू शकता.

या फोटोवरून आपणास हे कळते कि आपल्याला प्लास्टिकचा हा मोह टाळावा लागेल नाहीतर सगळीकडे कचराच कचरा दिसणार. पृथ्वी सुंदर आहे आणि जीवन त्यापेक्षाही सुंदर आहे कृपया याचा उपभोग घ्या.

आपल्याला हि माहिती आव्द्ल्यासा वश्य शेअर आणि लाईक करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या कडील खासरे माहिती आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *