मदर्स डे कसा सुरु झाला ?

मुलं कितीही मोठी झाली तरी आईचं आईपण कधीच संपत नाही. आयुष्यभर तिच्या उपकारातून परतफेड होऊच शकत नाही. आपल्या संस्कृतीत तर मात्यापित्यांना देवासमान स्थान आहे. एका “डे” मुळे विशेष काही फरक पडत नाही, मात्र एक दिवस तिच्याप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते अशी मुलांची भावना असते. जरी पाश्चात्य संस्कृतीकडून हा दिवस आपल्याकडे आला असला तरी भारतात मदर्स डे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जाणून घेऊया या मदर्स डे बद्दल…

मदर्स डे कसा सुरु झाला ?

अमेरिकेच्या ऍना मेरी जर्विस या महिलेच्या आई एक सोशल वर्कर होत्या. आपल्या वर्क क्लबच्या माध्यमातून मातांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या कार्यक्रम घ्यायच्या. कार्यक्रमात डॉक्टरांकडून उपस्थित महिलांना आरोग्यविषयक आणि मुलांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन केले जायचे. त्यांचं म्हणणं होतं की, आपल्या आईच्या प्रेम, त्याग आणि निस्वार्थीपणाचे आभार म्हणून दरवर्षी एक दिवस तिच्यासाठी देईल.

आपल्या आईचे हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ऍना जर्विसने पहिला मदर्स डे १९०८ मध्ये साजरा केला. ऍनाने लोकांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन केले. आज आपण सगळे जे काही आहोत ते आपल्या आईमुळे आहोत, म्हणून एक दिवस आपल्या आईसाठी वेळ द्या आणि तिची सेवा करून आभार माना.

मदर्स डे कधी साजरा केला जातो ?

ऍना जर्विसच्या आवाहनानंतर अमेरिकेत लोक आपापल्या सोयीनुसार मदर्स डे साजरा करायला सुरुवात केली. लोकांमधील आईविषयी कृतज्ञता पाहून अमेरिकाचे तत्कालीन प्रेसिडेंट थॉमस विल्सन यांनी ८ मे १९१४ रोजी घोषणा केली की मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून आपल्या आईसोबत साजरा करावा. ही घोषणा अमेरिकेच्या नागरिकांसाठी होती, पण आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरातील लोकांनी मदर्स डे साजरा करायला सुरुवात केली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *