काय हे ? एका कुत्र्याची किंमत १० कोटी ! अवश्य वाचाच…

काय हे ? रॉल्स रॉयस फँटम कारपेक्षा महाग आहे हा डॉग ! अवश्य वाचाच…

कित्येक लोक हौस म्हणून घरात वेगवेगळ्या जातींची कुत्री पाळतात. त्यांचं खाणं पिणं तर सोडाच, पण त्यांना आपल्या कारमध्ये शेजारी बसवून पार्ट्यांमध्ये जातात इथपर्यंतची किस्से आपल्याला माहित आहेत. शो साठी पाळल्या जाणाऱ्या कुत्र्यांची किंमत काही हजारांपर्यंत असते. पण तुमच्या ऐकण्यात कधी असं आले आहे का, की एखाद्या कुत्र्याची किंमत कोटींमध्ये आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. चला तर मग पाहूया या कुत्र्याबद्दल…

रॉल्स-रॉयस फँटम कारपेक्षा महाग डॉग

काही महिन्यांपूर्वी राजस्थानच्या जयपूर शहरातील दसरा मैदानावर एक डॉग शो भरवण्यात आला होता. त्यात विविध देशांतील ४० वेगवेगळ्या जातींच्या २०० हुन अधिक कुत्र्यांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यात सिंहासारखा दिसणारा “तिबेटियन मस्टिफ” जातीचा एक कुत्रा आणण्यात आला होता. ११ मे २०१९ च्या फर्स्टपोस्टच्या बातमीनुसार त्याची किंमत १५ ते ३० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही किंमत एवढी जास्त आहे की, या किमतीत आपण एखादी रॉल्स-रॉयस फँटम कारही खरेदी करू शकतो. १९ मार्च २०१४ च्या द वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीनुसार चीनच्या झेजियांगमधल्या एका “लक्झरी पेट फेअर”मध्ये जवळपास २ मिलियन डॉलर म्हणजेच आजच्या हिशेबाने १३ कोटी रुपयांच्या आसपास तिबेटियन मस्टिफची विक्री झाली.

असा आहे या जयपूरला आणलेल्या तिबेटियन मस्टिफ कुत्र्याचा थाट

दिल्लीच्या एका व्यक्तीने चीनमध्ये झालेल्या लिलावात हा तिबेटियन मस्टिफ खरेदी केला होता. या कुत्र्याला २४ तास एसीत ठेवावं लागतं. तसेच दर १५ दिवसाला त्याचा स्पा करावा लागतो. त्याचा आकार ३२ इंच असून वजन ७० ते ८० किलो आहे. या कुत्र्याला खाण्यासाठी खास इराणहून बदाम मागवण्यात येतात. तर त्याचे जेवण जर्मनीवरून मागवले जाते.

सर्वसाधारणपणे हिमालयीन पट्ट्यात या आढळणाऱ्या स्थानिक इंडियन मस्टिफ, हिमाचल गड्डी आणि भुतिया डॉग या प्रजातींसोबत असणाऱ्या साम्यामुळे भारतात तिबेटियन मस्टिफ जातीच्या कुत्र्यांची किंमत कमी असते म्हणजेच २ ते ५ लाख रुपये इतकी कमी आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक व शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info @khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *