सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झालेल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याचे टिकटॉक व्हिडीओ व्हायरल!

सोशल मीडियावर सध्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले बघायला मिळत आहेत. पिवळ्या साडीत असलेल्या या अधिकारी महिलेला रातोरात प्रसिद्धी मिळाली आहे. नलिनी सिंह असे त्यांचे नाव असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये करण्यात येत आहे. व त्या जिथे ड्युटीला होत्या तिथे १०० टक्के मतदान झाल्याचे बोलले जात होते.

त्यांचं नाव नलिनी सिंह आहे व त्या मिसेस जयपूर राहिलेल्या आहेत असा दावा करण्यात येत होता पण त्यांचं नाव नलिनी सिंह नसून रीना द्विवेदी आहे. व्हायरल झालेले फोटो ५ मे २०१९ म्हणजे निवडणुकीच्या एक दिवसाआधीचे आहेत. त्या दिवशी रीना द्विवेदी लखनौच्या नगराममध्ये बूथ नंबर १७३ वर होत्या.

त्यांच्या बूथवर १०० टक्के मतदान झाल्याचं बोललं जात होतं पण त्यांच्या बुथवर ७० टक्के मतदान झालं आहे. रिना द्विवेदी या लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे. त्यांचे आता टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवरून त्या टिकटॉक या अँपवर देखील ऍक्टिव्ह असल्याचं दिसतं.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *