कसा विकत घेणार १००, १५०, २००, ५००, १००० रुपयाचे कलदार वाचा माहिती..

२९ जून २०१७ रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीमद राजचंद्रजी यांच्या दिडशेव्या जयंतीदिनी त्यांच्या स्मरणार्थ १५० रुपयांचे एक नाणे प्रसिद्ध करण्यात आले होते. हा कॉइन भारत सरकारच्या कोलकाता येथील टांकसाळीतर्फे जारी करण्यात आला आहे. या नाण्यामध्ये ५०% चांदीचे प्रमाण आहे. आपण जर नाण्यांचे संकलन करत असाल किंवा आपल्याला हा कॉइन हवा सेल तर आपण घरबसल्याही हा १५० रुपयांचा कॉइन विकत घेऊ शकता. त्यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया करा.

कसा खरेदी करायचा १५० रुपयांचा कॉइन ?

सर्वप्रथम कोलकाता मिंटच्या http://igmkolkata.spmcil.com वेबसाईटवर जा. तिथे तुमची माहिती व पत्ता भरुन Sign Up करा. पुढे Trending Coins मेनु मध्ये गेल्यावर आपल्याला वेगवेगळ्या किमतीची कॉईन दिसतील. त्यातून आपल्याला हवा असणारा १५० रु.चा कॉईन निवडा. तिथे कॉइनच्या विक्रीचा कालावधीही दिलेला असतो. तिथे Proof Price आणि UNC Price असे दोन पर्याय दिलेले असतात. प्रूफ कॉइनची क्वालिटी यूएनसी कॉईनपेक्षा चांगली असते.

आपल्याला हव्या असणाऱ्या कॉइनची संख्या पुढच्या रकान्यात टाकून Add to Cart वर क्लिक करा. पुढे View Cart वर क्लिक करा. पुढे त्या कॉइनसाठी आवश्यक असणारी रक्कम ऑनलाईन भरा. रक्कम जमा झाल्यानंतर आपण दिलेल्या पत्त्यावर कॉइन पाठवले जातील. ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर Customer Corner वर क्लिक करुन Track Order वर जा. तिथून आपल्या ऑर्डरवर जा. तिथे आपल्या ऑर्डरची डिटेल्स दिलेली असतात. ऑर्डर दिल्यापासून हा कॉइन तयार करण्यापासून ते आपल्याला घरपोच होईपर्यंत सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो

भारत सरकारच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या मुंबई, कोलकाता, हैद्राबाद आणि नोएडा टांकसाळींमधून वेगवेगळे कॉइन तयार केले जातात. spmcil.com या होमपेजवर जाऊन आपण वेगवेगळे टंकसाळ निवडून कॉईन, मेडल इत्यादी घेऊ शकता. प्रत्येक टंकसाळ वेगवेगळे कॉईन बनवतो. Products या मेनूमध्ये आपल्याला हे कॉईन बघायला मिळतील . तसेच एसपीएमसीआयएल युनिटमध्ये टंकसाळ बघायला मिळतील.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक व शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *