महिला निवडणूक अधिकारी झाली सोशल मीडियामुळे रातोरात स्टार; जाणून घ्या कोण आहे ती?

सोशल मीडियावर सध्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले बघायला मिळत आहेत. पिवळ्या साडीत असलेल्या या अधिकारी महिलेला रातोरात प्रसिद्धी मिळाली आहे. या महिलेचे व्हायरल झालेले फोटो हे जयपूरचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. जयपूरमधील कुमावत शाळेच्या पोलिंग बुथवर तिची ड्युटी असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नलिनी सिंह असे त्यांचे नाव असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये करण्यात येत आहे. व त्या जिथे ड्युटीला होत्या तिथे १०० टक्के मतदान झाल्याचे बोलले जात होते.

काय होतं व्हायरल पोस्टमध्ये-

“या जयपूरच्या मिसेस नलिनी सिंह आहेत. ज्या समाज कल्याण विभागात कार्यरत आहेत. त्यांची ड्युटी कुमावत शाळेत होती. त्यांच्या बुथवर १०० टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक ठिकाणी अशी युक्ती करायला हवी.”

कोण आहे हि महिला निवडणूक अधिकारी?

या महिलेचं नाव नलिनी सिंह आहे व त्या मिसेस जयपूर राहिलेल्या आहेत असा दावा करण्यात आला आलाय . पण तो खोटा आहे. या महिला अधिकाऱ्याच्या फोटोंना हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले आहेत. फेसबुकचं नाही तर हे फोटो हॉट्सअ‍ॅपवरही व्हायरल झाले आहेत.

पण या फोटोतील महिलेविषयी सत्य आता बाहेर आले असून त्यांचे नाव नलिनी सिंह नसून रीना द्विवेदी आहे. नवभारत टाइम्सने यासंबंधी वृत्त दिले असून त्यामध्ये हे फोटो जयपूरचे नाही तर लखनौचे असल्याचे सांगण्यात आले आहे. हे फोटो पत्रकार तुषार रॉय यांनी काढलेले आहेत. ईव्हीएम मशीन घेऊन रिना द्विवेदी या लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे.

व्हायरल झालेले फोटो ५ मे २०१९ म्हणजे निवडणुकीच्या एक दिवसाआधीचे आहेत. त्या दिवशी रीना द्विवेदी लखनौच्या नगराममध्ये बूथ नंबर १७३ वर होत्या. यावर रीना यांनी सांगितले की, ‘मी तर माझी ड्युटी करत होते. मी जेव्हा माझ्या टीमसोबत ईव्हीएम मशीन घेऊन जात होते, तेव्हा एका पत्रकाराने माझे फोटो काढले. हे फोटो व्हायरल झाले आहेत. आता तर लोक रस्त्याने जातानाही माझ्यासोबत सेल्फी घेत आहेत’.

त्यांच्या या फोटोवर काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांच्या बूथवर ७० टक्के मतदान झालं. म्हणजे फोटोसोबत १०० टक्के मतदान झाल्याचं बोललं जातंय ते चुकीचं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *