अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांच्याविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल!

अमिताभ बच्चन यांना फिल्म इंडस्ट्री मधील शहंशाह म्हणून ओळखले जाते. बिग बी ला बॉलीवूडमध्ये आता ५० वर्ष होऊन गेले आहेत. ते पहिले असे अभिनेते आहेत जे एवढ्या वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ५० वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही कधी त्यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांच्याविषयी ऐकले आहे का?

आपल्यापैकी खूप कमी जणांनी अमिताभ यांच्या भावाविषयी ऐकलं किंवा वाचलं असेल. खासरेवर जाणून घेऊया अजिताभ यांच्या भावाविषयी माहिती..

अजिताभ हे आपले मोठे भाऊ अमिताभ यांच्यापेक्षा ५ वर्षांनी लहान आहेत. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींचा भाऊ म्हणल्यावर अजिताभ हे नाव सर्वाना माहिती असायचं हवं होतं. पण अजिताभ हे अन्य सेलिब्रिटींच्या भावापेक्षा थोडे वेगळे आहेत. ते कॅमेरा आणि लाईम लाईटपासून दूर राहणं पसंत करतात. जाणून घेऊया ते सध्या कुठे आहेत आणि काय करतात.

७२ वर्षीय अजिताभ बच्चन हे भारतातील एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. या अगोदर ते १५ वर्षे लंडनमध्ये राहिले. लंडनमध्ये राहून ते आपला बिझनेस सांभाळायचे. अजिताभ यांचे लग्न रमोला यांच्यासोबत झालेले आहे. त्यासुद्धा उद्योगपती असून त्यांचं देखील मोठं नाव आहे. लंडनमध्ये पार्टीमध्ये त्यांना पार्टीची शान बोलले जाते.

२००७ मध्ये त्यांची आई तेजी बच्चन यांचं निधन झाल्यानंतर ते भारतात शिफ्ट झाले. अजिताभ आणि रमोला यांना चार मुलं आहेत. मुलगा भीम आणि मुली नीलिमा, नम्रता, नैना या मुली आहेत. नैनाचे २०१५ मध्ये अभिनेता कुणाल कपूरसोबत लग्न झाले. भीम बच्चन हे पेशाने एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत आणि न्यूयॉर्कमध्ये राहायचे. ते देखील काही वर्षांपूर्वी भारतात शिफ्ट झाले आहेत.

मुलगी नम्रता हि आर्टिस्ट आहे. ती मुंबई आणि दिल्लीमध्ये पेंटिंगचे एक्सिबिशन भरवते. अजिताभ यांचे संपूर्ण कुटुंब प्रसिद्धी पासून दूर राहते. अमिताभ आणि अजिताभ हे अनेक वर्षांपर्यंत वेगवेगळे आहेत. दोघे देखील आपल्या कामात बिझी असतात. दोघांचे संबंध खूप चांगले असून त्यांचे मैत्रीचे नाते आहे.

कमाईच्या बाबतीत देखील अजिताभ हे अमिताभ यांच्यापेक्षा कमी नाहीयेत. लंडनमध्ये राहून त्यांनी खूप पैसे आणि नाव कमावलं आहे. भारतात देखील ते एक मोठ्या उद्योगपतींपैकी एक मानले जातात. अजिताभ आणि रमोला हे सोबत अमिताभ यांचे सिनेमा देखील बघतात. अजिताभ यांच्या पत्नी लंडनमध्ये एक सक्सेसफुल लेडी म्हणून परिचित आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *