कधीकाळी वडील हॉटेलात भांडी घासायचे, आज देशभरात आहेत सुनील शेट्टीचे स्वतःचे रेस्टोरंट

कधीकाळी वास्तवातल्या सुनील शेट्टीची परिस्थिती ही हेराफेरी चित्रपटात दाखविलेल्या श्याम प्रमाणेच अत्यंत हलाखीची होती. मात्र या बॉलिवूड अभिनेत्याने कुठलीही हेराफेरी न करता आपल्या अभिनयाच्या जोरावर हलाखीच्या परिस्थितीवर मात केली. आज आपण पाहणार आहोत सुनील शेट्टीचा प्रेरणादायी प्रवास…

कधीकाळी वडील हॉटेलात धुवायचे भांडी
सुनील शेट्टीचे वडील वरळी येथील एका हॉटेलात वेटर होते आणि तिथे ते भांडी धुवायचे काम करायचे. २०१३ मध्ये आपल्या नव्या डेकोरेशन शोरुमचे उदघाटन करताना सुनील शेट्टीने सांगितले की, त्याच्या वडिलांनी वयाच्या ९ व्या वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली होती. अंक वर्षांच्या मेहनतीनंतर १९४३ मध्ये वीरप्पा शेट्टींनी वरळीत एक बिल्डिंग खरेदी केली होती. सुनील शेट्टीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्याने चित्रपटांबरोबरच अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवला आहे.

सुनील शेट्टी वर्षाला कमवतो १०० कोटी
आपल्या सुनील शेट्टी फक्त चित्रपटात काम करतो एवढेच माहित आहे. पण त्याचे अनेक व्यवसाय आहेत. संपूर्ण देशामध्ये सुनील शेट्टीचे फिटनेस सेंटर आहेत. तसेच मुंबईमध्ये “मिसचीफ” नावाने अनेक बुटीक सेंटर आहेत. सुनील शेट्टीची “व्हेंचर एस २” नावाची स्वतःची रियल इस्टेट कंपनी आहे. पॉपकॉर्न एन्टरटेनमेन्ट नावाचे स्वतःच्या मालकीचे प्रोडक्शन हाऊस आहे. तसेच मुंबई आणि देशभरात अनेक रेस्टोरंट आहेत.

६२०० स्क्वेअर फुटांचा आहे सुनील शेट्टीचा फ्रेम हाऊस
सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसचे डिझाईन आणि बांधकाम जॉन अब्राहमचे वडील जॉन अब्राहम यांच्या आर्किटेक्ट कंपनीने नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेऊन केली आहे. तर इंटेरियर सुनीलची पत्नी माना शेट्टीने केले आहे. सुयोग्य रचना, नक्षीदार हिरवळ, सुंदर अंतरसजावट, नैसर्गिक खेळती हवा, स्कायलाईट अशा विविध गोष्टी फार्महाऊसबद्दल बरंच काही सांगून जातात. ६२०० स्क्वेअर फुटांच्या या फार्महाऊसमध्ये खाजगी गार्डन, स्विमिंग पूल, दुप्पट उंची असणारी लिव्हिंग रुम, ५ खोल्या आणि किचन आहेत. स्विमिंग पूलला जोडून असणारी डायनिंग रुम हे इथले खास आकर्षण आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *