स्टीफन हॉकिंग : वयाच्या २१ व्या वर्षी जडला असाध्य रोग, पण कर्तृत्वावर बनले जगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ !

विश्वप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. वयाच्या २१ व्य वर्षी त्यांना असाध्य रोग जडला होता. परंतु त्यांनी हिंमत न हारता प्रयत्न केले आणि ते जगातिल सवोत्कृष्ट शास्त्रज्ञ बनले. स्टीफन हॉकिंग केम्ब्रिज विद्यापीठात थिओरिटिकल कोस्मोलॉजीचे संचालक होते. स्टीफन हॉकिंग यांना अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यानंतरचे सर्वात मोठे भौतिकशास्त्रज्ञ मानले जाते.

हॉकिंग यांना जडलेल्या असाध्य रोगामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती. केवळ कॉम्प्युटर आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने ते आपले विचार व्यक्त करू शकत होते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्टीफन हॉकिंग यांनी आपल्याला काही कानमंत्र दिले आहेत, ते स्मरणात ठेवले तर आपणही आपले ध्येय गाठू शकतो.

१) माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचे अज्ञान नाही, तर त्याचा ज्ञानी असण्याचा भ्रम हे आहे. परिवर्तन किंवा बदलाच्या बाबतीत हॉकिंगचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक राहिला आहे. त्यांच्या दृष्टीने ज्ञानी असण्याचा अर्थ बदल स्वीकारण्याची क्षमता असणं हा आहे.

२) आपण आपल्या स्वार्थ आणि मुर्खपणामुळे स्वतःचे अस्तित्व संपवत आहोत. आपले आयुष्य कितीही कठीण असले तरी आपण त्यातदेखील काही ना काही काहीतरी करू शकतो आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.

३) मी असेही काही लोक बघितले आहेत जे म्हणतात की सर्व काही अगोदरपासुनच ठरलेले आहे आणि आपण काही केलं तरी ते बदलू शकत नाही. मात्र तेच लोक इकडेतिकडे बघितल्याशिवाय रस्ता पार करत नाहीत.

४) जर तुम्ही नेहमी राग किंवा तक्रारी व्यक्त करत असाल तर लोकांना तुमच्यासाठी वेळ नसतो. ५) जेव्हा एखाद्याची आशा एकदम संपून जाते, तेव्हा त्याला खरोखरच त्याच्याजवळ असणाऱ्या गोष्टींचे महत्व कळते.

६) काम तुम्हाला अर्थ आणि उद्देश देते, त्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. ७) प्रत्येक व्यक्तीजवळ आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवण्याची संधी असते, मग त्याच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी काही फरकी पडत नाही.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *