या कारणामुळे बीडचा निकाल लागणार सर्वात उशिरा तर साताऱ्याचा सर्वात आधी!

देशात लोकसभेच्या निवडणूका आता अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत असून महाराष्ट्रातील मतदान पहिल्या चार टप्प्यात पूर्ण झालं आहे. तर देशातील ७ पैकी पाच टप्पे पूर्ण झाले असून दोन टप्प्यांसाठीचं मतदान बाकी आहे. पण ही मतदानप्रक्रिया संपण्याआधीच अनेकांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील मतदान लवकर पूर्ण झाल्यामुळं निकालासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकालाच्या दिवशी देखील अनेक मतदारसंघात निकाल जाहीर होण्यास बराच उशीर होणार आहे.

बीडच्या निकालाला होणार उशीर तर साताऱ्याचा निकाल लागणार लवकर-

महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात काँटे की टक्कर बघायला मिळाली. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान पार पडलं. तर पहिला डिकल महाराष्ट्रातून गडचिरोली लोकसभा मतदारसंघातूनच हाती येण्याची शक्यता आहे. साधारणत: दुपारी १ वाजेपर्यंत या मतदारसंघातील निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून सर्वात कमी म्हणजेच ५ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. याशिवाय सातारा मतदारसंघाचा निकाल देखील लवकरच लागणार आहे.

बीडमध्ये निकालाला सर्वात जास्त उशीर लागणार आहे. बीड मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. बीड मध्ये ३६ मतदार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामुळे बीडचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. बीडचा निकाल साधारणतः ४ वाजेच्या सुमारास लागेल.

गडचिरोली शिवाय सातारा, लातूर, नंदूरबार, रत्नागिरी, पालघर या मतदारसंघांतील निकाल लवकरच स्पष्ट होतील. या जागांवर २३ मे रोजी दुपारी १ वाजता निकाल लागतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *