हार्दिक पांड्यासोबत दिसणारी हि तरुणी कोण आहे माहिती आहे का?

मुंबई इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या आयपीएलमधील परफॉर्मन्समुळे सध्या चांगलाच गाजत आहे. मात्र हार्दिकसोबतचा फोटो शेअर केल्यामुळे एक तरुणीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा चांगलाच सामना करावा लागला आहे. त्या तरुणीने टाकलेल्या फोटोवर नेटिझन्सनी खूपच भडक प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेऊया काय आहे प्रकरण…

कोण आहे ती तरुणी ?

क्रिस्टल डिसुझा या टीव्ही अभिनेत्रीने चार दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलवरून तिचा आणि हार्दिक पांड्याचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोला तिने मुंबईकरांच्या स्टाईलने “माझ्या भावासारखा कोणी हार्डच नाही आहे” असे कॅप्शन देऊन खाली Brotherfromanothermother असा हॅशटॅग जोडला आहे.

या फोटोला तीन लाखांहून अधिक लाईक असून त्यावर २००० हुन अधिक कमेंट आल्या आहेत. त्यामध्ये अनेक अश्लील कमेंटचाही समावेश आहे. हा फोटो काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका रेस्टोरंटमधील आहे.

का झाली क्रिस्टल ट्रोल ?

मागच्या काही महिन्यापूर्वी हार्दिक पांड्या आणि के.राहूल हे दोघेजण करण जोहरचा प्रसिद्ध शो “Coffee with Karan” मध्ये सहभागी झाले होते. त्या शो दरम्यान हार्दिक आणि राहुलने महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यांवरून देशभरातुन दोघांवर प्रचंड टीका झाली होती. बीसीसीआयनेही त्यांना शिक्षा केली आणि त्यांना माफीही मागावी लागली होती.

क्रिस्टलने टाकलेल्या फोटोमुळे लोकांच्या त्या शो मधील आठवणी जाग्या झाल्या आणि त्यांनी क्रिस्टलला ट्रोल केले. ट्रॉलर्सना बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणाने समजावण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिकने मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *