सई पल्लवीचा तत्वनिष्ठपणा; नाकारली २ कोटींच्या जाहिरातीची ऑफर

प्रेमम या अत्यंत गाजलेल्या मल्याळम चित्रपटातील “मिस मलर”च्या भूमिकेमुळे सई पल्लवी ही केरळची अभिनेत्री तरुणांच्या हृदयावर अक्षरशः अधिराज्य गाजवत आहे. प्रेमम मधील मलर पाहिली की आपली क्रशसुद्धा मलर सारखीच असायला हवी हा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. अशी ही मलर आपल्या तत्वांच्या बाबतीतही तितकीच प्रसिद्ध आहे. या तत्वांमुळेच नुकतेच तिने २ कोटींची ऑफर नाकारली आहे. जाणून घेऊया मलरच्या या निर्णयाबद्दल…

काय होती ऑफर ?

भारतीय लोकांना गोऱ्या रंगाचे फार आकर्षण आहे. आपण अधिक गोरे दिसण्यासाठी किंवा आपला गोरेपणा टिकवून ठेवण्यासाठी लोक खर्च करायला मागेपुढे पाहत नाहीत. लोकांच्या याच आकर्षणाचा फायदा घेऊन आमचे प्रॉडक्ट आपला रंग उजळवेल असा दावा करत बाजारात अनेक फेअरनेस प्रॉडक्ट्सनी आपल्या व्यवसायाचा डोलारा उभा केला.

आपल्या प्रोडक्टचा खप वाढावा म्हणून सिनेमातील कलाकारांना कोट्यवधी रुपये देऊन त्यांच्याकडून जाहिराती केल्या जातात. अशाच एका फेअरनेस प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी सई पल्लवीला २ कोटींची ऑफर आली होती.

सईने का नाकारली ऑफर ?

सई ही खूप तत्वनिष्ठ अभिनेत्री आहे. तिने यापूर्वी कधीही ब्युटी प्रॉडक्ट्सचा प्रचार केला नाही. प्रत्येकाने स्वतःबद्दल आणि आपल्या रंगाबद्दल आत्मविश्वास बाळगायला हवा असं सईचे म्हणणे आहे. वास्तवात आपण ज्या जाहिराती पाहतो त्यातील कुठलाही सेलेब्रिटी अशा सौंदर्य प्रसाधनांचा स्वतःसाठी वापर करत नाही.

या जाहिरातींमधल्या सेलेब्रिटींकडे पाहून लोक भुलतात आणि हे ब्युटी प्रॉडक्ट्सवाले त्यावर कामे करतात. सई आपल्या आयुष्यात असल्या कुठल्याही ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करत नाही. तसेच चित्रपटातही कमीत कमी मेकअप करण्याचा तिचा आग्रह असतो. आपल्या या तत्वासाठी सईने २ कोटींच्या जाहिरातीला नकार दिला.

सई पल्लवीच्या आधीही बॉलिवूडमधील सुशांत सिंग राजपुतने “एखाद्या वस्तूबद्दल पैसे घेऊन चुकीची माहिती पसरवायला नको” १५ कोटींची ऑफर देणाऱ्या चेहरा उजळवण्याचा दावा करणाऱ्या क्रीमच्या जाहिरातीला नकार दिला होता. त्याआधी अक्षय देओलनेही अशा जाहिरातीस नकार दिला होता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *