अबब मेट गाला मधील प्रियंकाच्या या चित्रविचित्र कपड्याची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल..

आतापर्यंत आपण वाचले की प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यासारख्या भारतीय अभिनेत्री “मेट गाला” नावाच्या कुठल्यातरी इव्हेंटमध्ये गेले होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो झळकल्यानंतर प्रियंकाला तर नेटिझन्सनी तिच्या ड्रेस आणि कपड्यांवरून खूप ट्रोल केले आहे. मेट गाला इव्हेंटला आपण फॅशनच्या क्षेत्रातील वर्ल्ड कप समजू शकता. प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा इव्हेंट भरवला जातो.

संगीत, चित्रपट, फॅशन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व यात सहभागी होतात. न्यूयॉर्क मध्ये मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट नावाचे एक ठिकाण आहे, तिथूनच मेट हे नाव घेण्यात आले. इंग्रजीत गाला म्हणजे पर्व ! हे दोन्ही शब्द जोडून मेट गाला हे नाव तयार झाले. निधी संकलन हे या इव्हेंटमागचे प्रमुख कारण आहे. इथल्या एंट्रीसाठीच एक कोटीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात.

प्रियंकाचा हा लुक Susan Sontag यांच्या १९६४ मधील निबंध “नोट्स ऑम कॅम्पवर” वर आधारित होता. मिमी करटेल हि प्रसिद्ध स्टायलीस्ट तिने प्रियंका व निकला हा लुक दिला होता. Vogue या प्रसिद्ध फैशन मैगझिन नुसार तिचा हा पोशाख तब्बल ४५,८३,२८० एवढ्या रुपयाचा होता. तर तिच्या पायातील सॅडल immy Choo silver pumps या कंपनीची तब्बल २४,०३० रुपये एवढ्याची होती.

Copacabana Collection मधील अनेक हिरे तिच्या या पेहरावाची शान वाढवत होते. तर तिच्या कानातील डायमंड इयरिंग घातले आहेत त्याची किंमतही सुमारे ४,५०,००० एवढी आहे.पण या सर्वात खास होते ते म्हणजे निकच्या मनगटावरचे घड्याळ. 38 कॅरेट हिऱ्यांनी मढवलेल्या या घड्याळाला व्हाइट गोल्डन प्लेट केले होते. या घड्याळाची भारतीय किंमत जवळपास 20 लाखांपेक्षा अधिक आहे.

तिने या प्रसंगात सर्वाचे लक्ष आकर्षित करून घेतले होते हे नक्की आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *