कडकनाथ नेमका कोणाचा ? दोन राज्यामध्ये लागले भांडण !

कडकनाथ जातीच्या कोंबडीच्या अंड्यांचा, रक्ताचा आणि मांसाचा रंग काळा असल्याने स्थानिक भाषेत तिला “कालामासी” म्हणूनही ओळखतात. मात्र कडकनाथ कोंबडीचे उत्पत्तिस्थान कोणते यावरून सध्या भारतातील दोन राज्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण…

कोणत्या राज्यांमध्ये सुरु आहे वाद ?

मागच्या ४-५ वर्षांपासून कडकनाथ जातीच्या कोंबड्यांना मांसाहारी खवय्यांकडून चांगलीच मागणी मिळत आहे. अशा या कडकनाथला आपल्या राज्याचे जीआय टॅगिंग मिळावे यासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी चेन्नईस्थित GI नोंदणी कार्यालयात मागणी केली आहे.

कडकनाथची मूळ उत्पत्ति मध्यप्रदेशाच्या झाबुआ प्रांतात झाल्याचे मध्यप्रदेशचे म्हणणे आहे तर छत्तीसगडमधील दंतेवाडा प्रांतात कडकनाथ कोंबड्यांची नैर्सगिक प्रजनन आणि वाढ केली जात असल्याने छत्तीसगडलाच कडकनाथचे जीआय टॅगिंग मिळावे अशी त्यांची मागणी आहे.

कडकनाथ वरून एवढे भांडण का ?

कडकनाथ कोंबडी ही पवित्र मानली जाते. अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये देवीदेवतांना बळी देण्यासाठी तिचा वापर केला जातो. कडकनाथचे मांस शरीरासाठी औषधी आहे. कडकनाथचे मांस कामोत्तेजक म्हणून वापरतात. शरीरातील रक्तदाब, अंगावरील कोड, दमा,अस्थमा, टीबी अशा आजारांवर कडकनाथचे मांस गुणकारी आहे. औषधी गुणधर्मामुळे कडकनाथचे मांस प्रचंड महाग असूनही त्याला खवय्यांकडून चांगलीच मागणी आहे. अशा कडकनाथला आपल्या राज्याचे भौगोलिक निर्देशांक मिळावा यासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात स्पर्धा आहे.

जीआय निर्देशांक म्हणजे काय ?

एखाद्या वस्तूचा भौगोलिक उगम सांगणाऱ्या पद्धतीस भौगोलिक निर्देशांक म्हणून ओळखतात. ही एकप्रकारची बौद्धिक संपदा आहे. जीआय निर्देशांक मिळण्यासाठी प्रामुख्याने दोन निकषांची पूर्तता होणे आवश्यक असते. एक म्हणजे ती वस्तू एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिसरातील असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या वस्तूचा दर्जा किंवा वस्तुतील गुणधर्म हे ती वस्तू त्या विशिष्ट भागाशी संबंधित असल्यामुळे असले पाहिजेत. हे निकष पूर्ण करणाऱ्या वस्तूंना जीआय निर्देशांक दिला जातो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *