काय असतो मेट गाला जिथे विचित्र कपड्यात गेल्या भारतीय हिरॉइन्स ?

आतापर्यंत आपण वाचले की प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यासारख्या भारतीय अभिनेत्री “मेट गाला” नावाच्या कुठल्यातरी इव्हेंटमध्ये गेले होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो झळकल्यानंतर प्रियंकाला तर नेटिझन्सनी तिच्या ड्रेस आणि कपड्यांवरून खूप ट्रोल केले आहे. तिचे वेगवेगळे मिम्स बनवले जात आहेत. तर हा “मेट गाला” इव्हेन्ट काय असतो ते जाणून घेऊया…

काय असतो मेट गाला इव्हेंट ?

मेट गाला इव्हेंटला आपण फॅशनच्या क्षेत्रातील वर्ल्ड कप समजू शकता. प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा इव्हेंट भरवला जातो. संगीत, चित्रपट, फॅशन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व यात सहभागी होतात. न्यूयॉर्क मध्ये मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट नावाचे एक ठिकाण आहे, तिथूनच मेट हे नाव घेण्यात आले.

इंग्रजीत गाला म्हणजे पर्व ! हे दोन्ही शब्द जोडून मेट गाला हे नाव तयार झाले. निधी संकलन हे या इव्हेंटमागचे प्रमुख कारण आहे. इथल्या एंट्रीसाठीच एक कोटीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात.

मेट गाला इव्हेंटमध्ये सगळे चित्रविचित्र अवतारात का येतात ?

मेट गालाची सुरुवात १९४६ मध्ये झाली. इव्हेंटसाठी दरवर्षी एक थीम ठरवली जाते. इव्हेंटसाठी येणारे सर्व लोक त्या थीम नुसार कपडे आणि मेकअप करून येतात. २०१९ साठी या इव्हेंटची थीम होती “Camp : Notes on Fashion”, म्हणजेच सर्वांना असे कपडे परिधान करायचे होते ज्यात खूप सारा ड्रामा असेल. त्यामुळेच आलेल्या सर्वांनी असे चित्रविचित्र कपडे घातले होते.

प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण झाल्या ट्रोल

मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राने ख्रिश्चियन डिओरचा चंदेरी ड्रेस परिधान केला होता. तिने अजब मेकअप केला होता. आपल्या भुवया पांढऱ्या केल्या होत्या. केस तर असे ठेवले होते जणू काय आताच तिला इलेक्ट्रिक शॉक दिला आहे.

दीपिकानेही जॅक पॉसेनचा गुलाबी गाऊन घातला होता. ती Disney मधील राजकुमारीसारखी दिसत होती. दोघींच्या या वेशावरून नेटिझन्सनी त्यांना दिवसभर चांगलेच ट्रोल केले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *