नगरमध्ये मुलगी व जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या सैराट प्रकरणात धक्कादायक खुलासे!

नगरमधील निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. पण या सैराट प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयास पेट्रोल ओतून जाळल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वडील मामा व काका यांच्यावर होता.

पोलिसांनी केलेल्या तपासात आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हा प्रकार ऑनर किलीगचा नसून पतीनेच पत्नीला जाळून मारल्याचा संशय पोलिसांना आहे.

घटना घडली तेव्हा रुख्मिणीसह तिची लहान भावंडे, निंचू (वय 6), करिश्‍मा (वय 5) विवेक (वय 3) घरातच होते. तर आई आणि वडीलही सकाळीच बाहेर गेले होते. स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांपूर्वी मंगेश आणि रुख्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. या विवाहाला दोघांच्याही कुटूंबांचा विरोध नव्हता.

मात्र मंगेश हा गुन्हेगारी प्रवत्तीचा होता. त्याने रुख्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून तो तीला बेदम मारहाण करीत असे. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रुख्मिणीला मारहाण केली होती. मारहाणीला कंटाळून रुख्मिणी गावातील आपल्या माहेरी निघून आली.

रुख्मिणी माहेरी आली असली तरी मंगेश कधीही येवून त्रास देईल ही भिती होती. या भितीने रुख्मिणीची आई बाहेर जाताना रुख्मिणीच्या लहान भावंडाना घरात ठेऊन दाराला बाहेरुन कुलुप लावून गेली होती.

आईला जो संशय होता तेच झाले आणि मंगेशने घराच्या मागच्या बाजूने पडलेल्या भागातून घरात प्रवेश केला. सोबत तो पेट्रोल देखील घेऊन आला होता. मंगेशनेच रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. पण रुख्मिणीने पेटल्यानंतर मंगेशला मिठी मारली. त्यामुळे मंगेश देखील भाजला. अशी माहिती रुख्मिणीचा लहान भाऊ निंचूने पोलिसांना सांगीतली आहे.

पोलिसांनी अगोदरच मुलीच्या वडिलांना मामा व काकाला अटक केली आहे. मुलीचा भाऊ छोटा असल्याने त्याचा जबाब ग्राह्य धरला जाणार नाही. शिवाय तो मयत मुलीचा भाऊ आहे त्यामुळे तो तिच्याच बाजूने बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस या प्रकरणी दोन्ही बाजूने तपास करत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *