फायनलचे हे रेकॉर्ड बघता मुंबईविरुद्ध चेन्नई फायनल झाल्यास मुंबईचे पारडे राहील जड!

काल मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जवर सहा विकेट्सने मात करत पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईला १३२ धावांवर रोखून मुंबईने मुंबईने हे आव्हान सहा विकेट राखून पार केलं. आयपीएलच्या बाराव्या मोसमात अंतिम फेरी गाठणारी मुंबई इंडियन्स ही पहिलीच टीम आहे.

या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईला चार बाद १३२ धावांत रोखून निम्मी कामगिरी फत्ते केली होती. पण या सामन्यात मुंबईला विजय मिळवून देण्यात मुंबईकर सूर्यकुमार यादवची महत्वाची भूमिका राहिली. सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७१ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईचा धुव्वा उडवला.

मुंबईच्या २ विकेट लवकरच गेल्या. त्यानंतर सामन्यात रंगत येईल असे वाटत असताना सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतक झळकावत ईशान किशनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भक्कम भागीदारी रचली.

चेन्नई संघाला फायनलचं तिकीट मिळवण्याची आणखी एक संधी आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर स्थान मिळालेल्या संघांना क्वालिफायर वन सामन्यात खेळण्याची संधी मिळते. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विजयी संघासोबत चेन्नईचा सामना होईल. त्या सामन्यातील विजयी संघाला फायनलमध्ये मुंबईचं आव्हान असेल.

मुंबई विरुद्ध चेन्नई फायनल झाल्यास मुंबईचे पारडे राहील जड-

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला मुंबईने सलग तीन वेळा हरवलंय. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपरकिंग्जला सर्वाधिक वेळा हरवण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे. मुंबईने पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबईने यापूर्वी २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. तर २०१० मध्ये पराभव झाला होता.

मुंबईचे ४ पैकी ३ फायनल चेन्नईविरुद्ध झाले आहेत. त्यामध्ये २ मध्ये मुंबईने विजय मिळवला तर एकवेळा चेन्नईने विजय मिळवला आहे. हा रेकॉर्ड बघता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स फायनल झाल्यास मुंबईचे पारडे जड असणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *