समुद्रकिनारी जायचंय ? दमणला जा ! राहणं आणि खाणं आहे एकदम स्वस्त !

गोवा, केरळ आणि आपल्या कोकणातील समुद्रकिनारी आपण नेहमीच जात असाल. या सगळ्यामध्ये आपण जर काही वेगळा पर्याय शोधत असाल तर दमण हे ठिकाण आपल्यासाठी एकदम चांगला पर्याय आहे. दमण हे ठिकाण दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल…

राहणं आणि खाणं आहे एकदम स्वस्त

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळे आहेत, पण ती काहीशी महागडी आहेत. त्यामानाने दमण आपल्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. दमणगंगा नदीमुळे दमणचे मोटी दमण आणि नानी दमण असे दोन पडतात. इथला समुद्रकिनारा तर सुंदर आहेच पण त्यासोबतच इथली खाद्यसंस्कृतीही खास आहे. इतर समुद्रकिनार्याच्या मानाने राहण्याच्या आणि खाण्याच्या गोष्टींबाबत दमण स्वस्त आहे.

दमणमध्ये काय काय पाहाल ?

१) सेंट जेरॉम किल्ला – नानी दमणच्या बाजूला असणारा हा किल्ला म्हणजे दमणमधील स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात चांगला आणि आकर्षक भाग आहे. या भागात पोर्तुगीजांच्या काळात उभा राहिलेल्या अनेक जुन्या वास्तू पाहता येतील. या भागातच १६०३ साली बांधण्यात आलेले कॅथेड्रेल ऑफ बोम जिजस नावाचे जुने चर्च आहे.

२) लाईट हाऊस – दमणमधल्या लाईट हाऊस वरून आपल्याला चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे अथांग पसरलेल्या अरबी समुद्राचा नजाऱ्यासोबतच मच्छी मार्केट आणि समुद्रामध्ये जागोजागी विखुरलेल्या छोट्यामोठ्या अनेक बोटी बघायला मिळतील. आपल्या जोडीदारासोबत एकदम उत्तम वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. दमणमधला सूर्योदयासोबतच इथला सूर्यास्त पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते.

३) बीच – दमणला अनेक बीच आहेत. त्यातल्या त्यात जॅम्पोरे आणि देवका हे इथले गर्दीचे बीच आहेत. दमणमधल्या सर्वोत्तम सी-फूडचा आस्वाद इथे मिळतो. या बीचवरचे वातावरण खूप शांत आणि मनोहर आहे. शौकिनांसाठी इथे चांगली रेस्टोरंट आणि बारही आहेत. तुम्ही जर आपल्या फ्रेंड सर्कल सोबत सहलीला जाणार असाल तर ही जागा तुमच्यासाठी खूप चांगली आहे.

४) दमणमधील इतर ठिकाणे – मोटी दमणच्या भागातील कॅथेड्रेल बोल जेसू चर्चच्या दारावरील येश्याच्या जीवनावर आधारित लाकडावरची चित्रकला पाहण्यासारखी आहे. याशिवाय अवर लेडी ऑफ रोजरी चॅपल चर्च, अवर लेडी ऑफ रेमिडीयोज चर्च, एलिफंट पार्क, काचीगाम वॉटर टॅंक. मिरसोल वॉटर पार्क, हत्ती उद्यान, हिलसा अक्वारियम, दमणगंगा नदीचा परिसर ही ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *