ड्युटीवर परतल्यानंतरचा विंग कमांडर अभिनंदन यांचा पहिला व्हिडीओ..

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे एक असे नाव आहे जे पाकिस्तान कधीच विसरू शकत नाही. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अगोदर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या फायटर जेटनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. या जेटना पळवून लावताना अभिनंदनने आपल्या मिग 21 ने पाकिस्तानचे F16 ला पाडले होते. याची देशभरात चर्चा झाली होती. हे F16 पाडल्यानंतर अभिनंदन हे पाकीस्तानच्या हद्दीत उतरले होते. त्यानंतर पाकीस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते.

त्यानंतर जिनिव्हा करारानुसार पाकिस्तान आर्मीने विंग कमांडर अभिनंदन यांना दोनच दिवसात बभारतीय आर्मीच्या स्वाधीन केले होते. भारतात परतल्यानंतर अभिनंदन हे सुट्टीवर होते. आता एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनंदन हे आपल्या सहकाऱ्यांसोबत दिसत आहेत.

हा व्हीडिओ काही दिवसांपूर्वीच असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये अभिनंदन हे ड्युटीवर परतले असून ते आपल्या सहकाऱ्यांसोबत गप्पा गोष्टी करत आहेत. सहकारी त्यांच्यासोबत फोटो काढत आहेत. फोटो काढल्यानंतर अभिनंदन यांनी एक मेसेज देखील दिला आहे.

सहकाऱ्यांना त्यांनी सांगितले की हे फोटो तुमच्यासाठी नसून तुमच्या कुटुंबियांसाठी आहेत. माझ्या सुरक्षेसाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. त्यामध्ये आपले कुटुंबीय देखील आहेत. हे फोटो त्यांच्यासाठी आहेत.

व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हजारो लोक याला खरा हिरो ड्युटीवर परतला म्हणून शेअर करत आहेत. अभिनंदन हे पाकिस्तानमधून परतल्यानंतर वैद्यकीय रजेवर होते. त्यांना परत ड्युटीवर बघून अनेकांना आनंद झाला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *