DRS ला उगाच धोनी रिव्यू सिस्टम म्हंटले जात नाही! बघा

किंग्स इलेव्हन पंजाबआणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये त्यांचा लीगमधील शेवटचा सामना काल पार पडला. या सामन्यात पंजाबने चेन्नईवर सहा विकेट्सनी मात करत आयपीएल २०१९ चा आपला शेवट गोड केला. लोकेश राहुल (७१) आणि ख्रिस गेल (२८) यांच्या १०८ धावांच्या सलामीने किंग्स इलेव्हन पंजाबने सहज विजय साकारला.

पंजाबने चेन्नईचे १७१ धावांचे लक्ष्य १८ व्या षटकातच सहज पार केले. निकोलस पुरणने २१ चेंडूंत ३६ धावा केल्या. राहुल आणि गेलने विस्फोटक सुरुवात केल्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये एक जोरदार अपील झालेले बघायला मिळाले. पावर प्ले चालू होता आणि राहूल आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता.

हरभजन सिंगच्या त्या ओव्हरमध्ये राहुलने स्वीप करण्याचा प्रयत्न केला पण तो चुकला. त्यानंतर LBW साठी जोरदार अपील करण्यात आले. हरभजनसह धोनीनेही अपील केले. अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतर धोनी रिव्हिव्ह घेतोय काय असे त्याच्या इशाऱ्यावरून एकदा वाटलं पण धोनीने हरभजनला सांगितले कि बॉल पॅडला नाही तर ग्लोव्ह्जला लागला आहे.

हरभजनला धोनीचा ईशाला कळाला नाही. त्यावर त्याने मोठ्याने ग्लोव्ह्जला बॉल लागल्याचे हरभजनला सांगितले. धोनीने स्टम्पच्या पाठीमागे काही सेकंदात हे हेरले आणि रिव्हिव्ह घेतला नाही. यावरून पुन्हा एकदा DRS ला धोनी रिव्हिव्ह सिस्टीम का बोलले जाते हे सिद्ध झाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *