राजीव गांधींचे ते ५ मोठे निर्णय ज्याने बदलला भारत !

१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर देशात निराशेचे वातावरण होते. त्यांनंतरच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला बहुमत देऊन राजीवजींना प्रधानमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी दिली. राजीव गांधींनी आपल्या कारकिर्दीत अनेक निर्णय घेतले. त्यातल्या काही निर्णयांचे कौतुक झाले, काहींवर टीका झाली तर काही आजही वादाच्या भोवऱ्यात आहेत. पण राजीव गांधींनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे देशाचा चेहरामोहरा बदलला हे ही तितकंच खरं आहे. जाणुन घेऊया अशा पाच प्रमुख निर्णयांबद्दल…

खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण धोरण

१९९० च्या सुमारास भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या काही अटींच्या अधीन राहून राजीव गांधींनी देशात खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण धोरणाचा अवलंब करण्यासाठी पावले उचलली. त्यांनी इन्कम आणि कॉर्पोरेट टॅक्सदर कमी केले. लायसन्स पद्धतीत सरळीकरण केले. संगणक, औषधी आणि कापड उद्योगावरील सरकारी नियंत्रण संपवले. सीमाशुल्क कमी करून गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेची दारे उघडून दिली.

चीन संबंधात सुधारणा

राजीव गांधींच्या डिसेंबर १९८८ मधील चीन दौऱ्याने दोन देशातील संबंधात सुधारणा होण्यात बरीच मदत झाली. तब्ब्ल ३४ वर्षांनंतर भारतीय सरकारकडून करण्यात आलेला हा पहिला चीन दौरा होता. या दौऱ्यात भारत-चीन सीमा प्रश्नासंबंधात शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी एका जॉईंट वर्किंग कमिटीची स्थापना करण्यात आली.

पंचायतराज व्यवस्थेला संविधानिक दर्जा

जनतेच्या हातात सत्तेचे अधिकार यावेत या दिशेने राजीव गांधींनी पंचायतराज व्यवस्था लागू करण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसने १९८९ मध्ये पंचायतराज व्यवस्थेला संविधानिक दर्जा देण्याचा प्रस्ताव पारित केला. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने पंचायतराज व्यवस्थेचा बराच उपयोग झाला. याशिवाय त्यांनी ग्रामीण भागात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयाची स्थापना केली.

तंत्रज्ञान क्रांती

तंत्रज्ञानाच्या जोरावरच भारत २१ व्या शतकात प्रगती करेल असे राजीव गांधी आपल्या भाषणात सतत सांगायचे. त्यासाठी त्यांनी टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष कार्य केले. भारतात कॉम्प्युटर क्रांतीचे श्रेय राजीवजींना जाते. त्यातूनच भारतात नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी या लोकांना आयटी कंपन्या स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.

युवा वर्गाचा राष्ट्रनिर्माणासाठी सहभाग

देशाच्या जडणघडणीत युवकांचा सहभाग वाढावा, निर्णयप्रक्रियेत त्यांचे योदान वाढावे यादृष्टीने राजीव गांधींनी देशातील मतदारांचे किमान वय २१ वरून १८ वर आणले. या निर्णयाला सुरुवातीला विरोध झाला. परंतु नंतर युवकांचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातील सहभाग पाहता राजीव गांधींच्या या निर्णयाचे कौतुक झाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *