निवृत्तीनंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार म्हणतोय अक्षय कुमार, बघा व्हिडीओ..

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या नागरिकतेवरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात २९ मे रोजी मुबंईत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानेही मतदान केले. मात्र अक्षय कुमार कुठेही दिसला नाही. अक्षय कुमार कॅनडा या देशाचा नागरिक असल्यामुळे तो मतदान करु शकला नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याला ट्रोल केले जात आहे.

कँनडाच्या नागरिकत्वावरून ट्रोल होत असतानाच आता अक्षय कुमारचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल केला जात आहे. हा व्हिडीओ कॅनडामध्ये शुट केलेला आहे. अक्षय कुमार या व्हिडीओमध्ये कॅनडावासियांना सांगतो की, “मी माझ्या फिल्मी करिअरमधून निवृत्त झाल्यानंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार आहे.”

हा व्हिडीओ कॅनडामधील टोरांटो येथील आहे. टोरांटोमधील नागरिकांना अक्षय कुमार म्हणतो की, “मला तुम्हाला सांगायचं आहे की, हे (टोरांटो, कॅनडा) माझं घर आहे. मी इंडस्ट्रीमधून (फिल्मी जग) निवृत्त झाल्यानंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार आहे.”

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *