आयपीएलचा मॅच बघायला आलेली हि तरुणी कॅमेरामनमुळे रातोरात झाली स्टार..

शिमरॉन हेटमायर आणि गुरकिरत सिंग यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून त्यांच्या प्लेऑफच्या आशा जर तर च्या घरात नेऊन ठेवल्या आहेत. कालच्या विजयासह आरसीबीने या हंगामाचा शेवट गोड केला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांना मोठी खेळी साकारता आली नाही.

३ बाद २० अशी अवस्था झाली असताना आरसीबीने हा विजय मिळवला. हैदराबादच्या १७६ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि एबी हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर मात्र हेटमायरने हैदराबादच्या गोलंदाजांना धारेवर धरले. हेटमायरने ४७ चेंडूंत ७५ धावांची दमदार खेळी साकारली. हेटमायर आणि गुरकिरत यांनी चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी रचली. हेटमायरनंतर गुरकिरतही बाद झाला, त्याने ४८ चेंडूंत ६५ धावा केल्या.

या सामन्याची अजून एक खासियत राहिली. हा सामना बघायला आलेली आरसीबीची फॅन असलेली एक तरुणी रातोरात स्टार झाली आहे. कॅमेरामनने मोठ्या स्क्रिनवर दाखवलेली एक अदा अनेकांच्या पसंतीस उतरली आणि हि तरुणी रातोरात स्टार झाली आहे. आपल्यापैकी अनेकांनी तिला मॅच बघताना टीव्हीवर बघितले असेल.

या तरुणीचे नाव आहे दीपिका घोष. तिची इंस्टाग्राम प्रोफाइल बघितली असता ती आरसीबीची मोठी फॅन असल्याचे दिसते. दीपिका मॅचमध्ये दिसल्यानंतर तिचा फोटो घेऊन अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी कॅमेरामन नि मन जिंकली. कॅमेरामनने दीपिका स्क्रिनवर दाखवली त्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात यावा अशा स्वरूपाच्या ट्विट आणि पोस्ट टाकल्या आहेत.

दीपिका मॅचच्या पूर्वी इंस्टाग्रामवर अवघे १-२ हजार फॉलोअर्स होते. पण मॅचनंतर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. रात्रीपासून तिच्या फॉलोअर्सचा आकडा हा ९० हजारापार गेला आहे. तिच्या फॉलोअर्सचा वेग बघता हि संख्या आजच दहा लाखाच्या घरात जाईल असे दिसते.

आरसीबीने या सिजनमध्ये विशेष काही केले नव्हते. पण हि शेवटची मॅच तर जिंकलीच पण एका फॅनला रातोरात स्टार मात्र नक्की केले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *