मासिक पाळीविषयी बहिणीच्या मनात असलेली अंधश्रद्धा भावाने कशी केली दूर, बघा व्हिडीओ..

मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी थोडी अगोदरही सुरु होऊ शकते. मासिकपाळी सुरु झाल्यावर रक्तस्राव होतो हे पाहून अनेक मुली घाबरतात. मासिक पाळीविषयी भारतात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. पाळीच्या काळात स्वच्छतेसंबंधी काळजी घेणे आवश्यक असते.

भारतात अनेक ठिकाणी महिलांना मासिक पाळीदरम्यान घराबाहेर ठेवले जाते. तर काही ठिकाणी त्यांना नियमित कामे करण्यापासून रोखले जाते. कुठे कुठे तरी एवढ्या घाण ठिकाणी त्यांना ते दिवस काढावे लागतात ज्याविषयी आपण कल्पना देखील करू शकत नाहीत. देवी देवतांपासून दूर ठेवले जाते.

मासिक पाळीविषयी असलेल्या अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर केले पाहिजेत. आज आपण अशाच एका बहीण भावाविषयी जाणून घेणार आहोत. या भावाने आपल्या बहिणीच्या मनात पाळीविषयी असलेली अंधश्रद्धा दूर केली.

अभिषेक वाल्टर नामक या तरुणाने यासंबंधी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. अभिषेकच्या छोट्या बहिणीच्या मनात देखील मासिक पाळीविषयी असेच अनेक गैरसमज भरवण्यात आले होते. अभिषेख ने हे गैसमज कसे दूर केले याचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिषेकच्या बहिण सिनीला सांगण्यात आलेले असते कि मासिक पाळीदरम्यान झाडाला पाणी नको टाकू नाही तर झाड जळेल.

अभिषेक सिनीला दोन दिवस झाडाला पाणी टाकायला लावतो. पण झाड जळत नाही. यामुळे सिनीच्या मनातील मासिक पाळीविषयीची अंधश्रद्धा दूर होते.

बघा व्हिडीओ-

आपल्या बहिणीच्या मनातील गैरसमज दूर करणाऱ्या या भावाला खरंच मानावं लागेल. आपणही आपल्या आजूबाजूला घरात अशाचप्रकारे मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर केले पाहिजेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *