चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर हल्ला, लगावली थोबाडीत !

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हल्ला असे समीकरणच झाले आहे. केजरीवालांवर सार्वजनिक रोड शो दरम्यान हल्ला करण्याचे प्रकार सतत घडत आहेत. एका मुख्यमंत्र्यावर अशा प्रकारे हल्ला करणे निषेधार्ह आहे. नुकताच केजरीवालांवर चौथ्यांदा हा प्रसंग ओढवला आहे. यावेळेस त्यांना थप्पड लागवण्यात आल्याची बातमी आहे.

कुणी लगावली केजरीवालांना श्रीमुखात ?
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी करमपुरा परिसरात आम आदमी पक्षाचे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या समर्थनार्थ रोड शो करत होते. रोड शो सुरु असताना सुरेश नावाच्या एक लाल रंगाचा शर्ट घातलेल्या संतप्त युवकाने जीपवर चढून केजरीवालांना थप्पड लगावली. त्यानंतर त्या युवकाला खाली खेचून आपच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली आहे. थप्पड लागवणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरेश हा दिल्लीच्या कैलास पार्क भागात स्पेअरपार्ट जोडण्याचे काम करतो.

यापूर्वीही तीनदा झाला होता केजरीवालांवर हल्ला
केजरीवालांवर यापूर्वी तीन वेळा असाच हल्ला झाला होता. मागच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी वाराणसी येथे रोड शो करत असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. २०१६ मध्ये छत्रसाल स्टेडियमवर एका महिलेने त्यांच्यावर शाई फेकली होती. तसेच २०१४ निवडणुकीत दिल्लीत रोड शो करत असताना एका रिक्षाचालकाने त्यांना थप्पड लगावली होती.

हल्ल्यावरून आपची भाजपवर टीका
केजरीवालांवरील हल्ल्याचा आपने निषेध केला असून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर झालेला हा हल्ला विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून झाला आहे आणि अशा हल्ल्याला आम्ही घाबरणार नाही असे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी ट्विट करून ” मोदी आणि शहा तुम्ही पाच वर्ष ताकद लावून ज्यांना हरवू शकले नाहीत अशा केजरीवालांचा काय आता जीव घेऊ इच्छिता का पळपुट्यांनो ?” असा प्रश्न विचारला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *