आपल्या चित्रपटांतून देशभक्तीचे धडे देणारा अक्षयकुमार नाहीये भारताचा नागरिक..

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर अक्षय कुमारच्या नागरिकत्वाचा मुद्दा देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. आता अक्षय कुमारने स्वत: त्याच्या नागरिकत्वाबाबत भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात २९ मे रोजी मुबंईत अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानेही मतदान केलं. मात्र अक्षय कुमार कुठेही दिसला नाही. त्यानंतर अक्षय कुमारला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

अक्षय कुमारने याविषयी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने नागरिकत्व कधीही लपवलेलं नाहीये असे सांगितले आहे. कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे देखील त्याने सांगतले आहे.

अक्षयकुमार आहे कॅनडाचा नागरिक-

अभिनेता अक्षयकुमार हा आजकाल आपल्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत असतो. अक्षय कुमार म्हणजेच देशभक्ती देशभक्तीपर चित्रपट हे समीकरण सध्या बनले आहे. भारतीय सिनेरसिकांना देखील अक्षयकुमारचे चित्रपट भुरळ घालतात. काही तरी हटके विषय आणि आपल्या खास अभिनय शैलीने त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरतात.

अक्षय कुमारचे देशभक्तीचे धडे देणारे चित्रपट बघून तुम्ही कधी विचार कराल का की अक्षय कुमार हा भारताचा नागरिक नाहीये? कोणीही अक्षयकुमारच्या भारतीय असण्याबद्दल शंका घेईल असं वाटत नाही.

पण अक्षयकुमार हा खरोखरच भारताचा नागरिक नाहीये. भारतात देशभक्तीचे धडे देणारा अक्षयकुमार हा कॅनडाचा नागरिक आहे.

काही वर्षांपूर्वी हिथ्रो विमानतळावर अक्षयकुमारला थांबविण्यात आले होते. तेव्हा त्याच्याकडे भारताचा नाही तर कॅनडाचा पासपोर्ट आढळला होता. त्यावरून त्याच्या नागरिकत्त्वाचा प्रश्न समोर आला होता. अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारलेले असून त्याची कॅनडाचा सांस्कृतिक दूत म्हणून देखील निवड करण्यात आलेली आहे.

अक्षयने का स्वीकारले कॅनडाचे नागरिकत्व?

अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व सोडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात लागणारा कर असल्याचे कळते. भारतात उत्पन्नावर तीस टक्के इन्कम टॅक्स (उपकर वेगळे) भरावा लागतो. त्या तुलनेत कॅनडातील दर कमी आहेत. तसेच तेथील एका मोठ्या मॉलमध्ये अक्षयकुमारने गुंतवणूक केलेली आहे. त्यासाठी कॅनडाचा नागरिक बनणे फायद्याचे असल्याने त्याने भारताचे नागरिकत्व सोडले आहे.

याव्यतिरिक्त अक्षय कुमार आपल्या उत्पन्नांतील काही मदत सैनिकांच्या कुटुंबांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देतो. पॅडमॅन, टाॅयलेट एक लव्ह स्टोरी, बेबी, गब्बर, एअरलिफ्ट हे अलीकडच्या काळात रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *