वीर्यातील शुक्राणू संख्या वाढविण्यासाठी पाच हमखास उपाय

पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंच्या घटत चाललेल्या समस्येने केवळ भातातच नाही, तर जगात मूळ धरले आहे. ज्या गोष्टीचा संबंध थेट मर्दपणाशी जोडला जातो अशी नाजूक बाब असल्याने पुरुष चिंताग्रस्त आहेत. त्यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञ वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करत आहेत. त्या संशोधनातून शुक्राणूंच्या संख्येत होणारी घट रोखून त्यांची मात्रा कशी वाढवावी यावर एकमत होईल असे निष्कर्ष शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहेत. जाणून घेऊया शुक्राणूंची संख्या वाढवण्याचे पाच हमखास उपाय…

१) अन्नात लायकोपिन असावे – जगात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या संशोधनानुसार असे आढळले आहे की, अन्नामध्ये लायकोपिनच्या वापरात वाढ झाली तर शरीरात शुक्राणूंच्या गुणवत्ता आणि संख्येत वाढ होते. लाल रंग असणाऱ्या अन्नद्रव्यांमध्ये म्हणजेच टोमॅट्टो, स्ट्रॉबेरी, गाजर, बिट, चेरी अशा अन्नपदार्थांत लायकोपिन भरपूर प्रमाणात असते. लाल भाज्या आणि अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीरात ७०% शुक्राणूवाढ होते.

२) लॅपटॉप, कॉम्प्युटरचा कमी वापर करा – Journal of fertility and sterility या मासिकाच्या माध्यमातून २०११ मध्ये केलेल्या प्रयोगाच्या आधारे शुक्राणूंच्या संख्येत होणारी घट आणि लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या वापरामध्ये काही तरी परस्परसंबंध आढळला आहे. त्यामुळे त्यापासून दुर रहा आणि वायफाय सारख्या उपकरणांचा कमीत कमी वापर करा.

३) जास्त वेळ बाईक चालवू नका – स्पेन देशात एक पाहणी केली गेली, त्यात असे आढळले होते की, बाईकवर तासनतास प्रवास करताना आपल्या गुप्तांगावर सतत ताण पडत असतो, त्यामुळेही शरीरातील शुक्राणू कमी होत जातात. त्यासाठी बराच वेळ चालणारा बाईकचा प्रवास टाळला पाहीजे.

४) तापमान – प्रौढ व्यक्तीच्या शरीरात असणाऱ्या शुक्राणुंची संख्या व तापमानाचा जवळचा संबंध आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर तापमान ३४-३५ च्या वर गेल्यास शरीरातील शुक्राणू घटतात. त्यावरून असे सांगता येईल की जास्त तापमानाच्या वेळी शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.

५) कॉफी अतिरेक कमी करा – कॉफीचे सेवन अधिक प्रमाणात झाल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या शुक्राणूसंख्येवर होत असतो. हे टाळण्यासाठी अतिरेक प्रमाणातली कॉफी पिणे टाळावे. कमी प्रमाणात घेतल्यास चालेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *