फक्त या २ गोष्टींनी होते पाण्याची टाकी आणि पाइप लाइनची स्वच्छता, नळांचे प्रेशर सुद्धा वाढेल;

घराची पाइपलाइन ब्लॉक होणे हि आपल्यापैकी अनेकांना येणारी नेहमीच अडचण असते. पाण्यात क्षारचे प्रमाण जास्त असल्यास दर महिन्याला ही अडचण येते. पाण्याची प्रेशर सुद्धा कमी होते. यावर पाईपलाईन स्वच्छ करणे हाच एकमेव उपाय असतो. त्यामुळे पाईपलाईन स्वच्छ करण्यासाठी प्लम्बरला पाचारण करावे लागतले.

प्लम्बरला बोलवायचे म्हणजे हे काम खर्चिक होते. कारण प्लम्बरची फी आणि सफाईसाठी लागणारे प्रोडक्ट याचा खर्च येतो. महिन्यात दोन वेळेस सफाई करण्याऱ्यांसाठी हा खर्च दुप्पट होते. खरं तर या कामाला प्लम्बरची मदत न घेता कमी खर्चात घरबसल्या करू शकतो. यासाठी तुम्हाला २० ते ४० रूपये किमतीचा हायड्रोजन पॅरॉक्साइड खरेदी करावा लागेल.

याबाबत IIT रूडकी येथून पीएचडी केलेले जीवाजी युनिव्हर्सिटी ग्वाल्हेरचे प्राध्यापक डीडी अग्रवाल यांनी सांगितले की, ब्लिचिंग पावडर आणि हायड्रोजन पॅरॉक्साइडच्या मदतीने टाकीची सफाई सोबत त्यातील जीवाणू देखील संपवता येतात. हायड्रोजन पॅरॉक्साइड हल्क्या निळ्या रंगाचे आणि पाण्यापेक्षा थोडे घट्ट लिक्विड असते.

पाइप लाइन सफाई करण्यासाठी तुम्हाला काही उपयोगी सामान अगोदर जमा करावे लागेल. त्यामध्ये ३ ते ४ बादली पाणी ५० ग्रॅम ब्लीचिंग पावडर आणि हायड्रोजन पॅरॉक्साइडची लहान बाटली (५०% स्ट्रेंथची) या गोष्टी लागतील.

पाइप लाइन साफ करण्याची प्रोसेस-

पाइप लाइन साफ करण्यासाठी सर्वांत अगोदर टाकीत फक्त ३ ते ४ बादली पाणी ठेवा. त्यानंतर पाण्यात हायड्रोजन पॅरॉक्साइडची लहान बाटली आणि ५० ग्रॅम ब्लिचिंग पावडर टाका. ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर एखाद्या काठीच्या आधारे ५ मिनिटांपर्यंत पाण्याला हलवा.

यानंतर टाकीला जोडलेले सर्व नळ चालू करा आणि पाण्याला बाहेर सोडा. पाणी सोडल्यानंतर नळातून ब्लिचिंग पावडरचा किंवा दुर्गंध आल्यावर नळ बंद करा. ही प्रक्रिया सर्व नळांसोबत करावी.

टाकीत तयार झालेले सोल्युशन सर्व नळांपर्यंत पोहचेल आहे. ते रात्रभर नळांमध्येच राहू द्या. सकाळी सर्व नळ चालू करा, यामुळे ते सोल्युशन बाहेर निघून जाईल. यानंतर टाकीत २०० ते ३०० लीटर स्वच्छ पाणी भरा आणि सर्व नळातून सोडून द्या. अशाप्रकारे टाकी आणि पाइप लाइन पूर्णपणे स्वच्छ होईल. त्यामध्ये सोल्युशनचा अंश राहणार नाही. आता सर्व नळांचे प्रेशर पहिल्यासारखा होईल. सोबतच जीवाणू आणि विषाणू नष्ट होतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *