नववीत नापास झाल्यामुळे आजोबांनी दूध विकायला लावले, मेहनतीने तो बनला ३ फॅक्टरींचा मालक !

आयुष्य माणसासोबत कसा खेळ खेळेल याचा काय नेम नाही. पण आयुष्यात संघर्ष करायची तयारी असेल तर माणसाला हवे ते मिळू शकतं. नववीत नापास झाला म्हणून राजवीर चावला नावाच्या ज्या मुलावर दूध विकायची वेळ आली,तोच मुलगा आज तीन फॅक्टरींचा मालक बनला आहे. त्या मुलाची ही यशोगाथा वाचल्यावर तुम्हालाही आयुष्यात संघर्ष करण्याची नवी उमेद मिळेल.

संकटात शोधली राजवीरने संधी

राजस्थानच्या भिवाडी इथल्या राजवीर नावाच्या मुलाची ही गोष्ट ! साधारण १८ वर्षांपुर्वी तो नववीत नापास झाल्यावर घरचे त्याच्यावर खुप रागावले. त्याच दुःखात तो आपल्या आजोबांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, “मला आयुष्यात खुप मोठं माणूस बनायचं आहे.” आजोबांनी क्षणभर त्याच्याकडे बघितले आणि म्हणले, “घरातील सायकल घेऊन दूध विकुन ये, परंतु त्यासाठी लागणाऱ्या दूधाची सोय तुला स्वतःच करावी लागेल.” बस्स ! इथूनच राजवीर्चे पुढचे आयुष्य बदलले.

कसा वाढवला राजवीरने व्यवसाय ?

आजोबांच्या सांगण्यावरून राजवीरने घरातील सायकल घेतली. गावात उधारीने ५ लीटर दूध घेतले आणि त्याची शहरात जाऊन त्याची विक्री केली. पहिल्याच दिवशी ५ लीटर दुधाची विक्री झाल्याने त्याला एक आत्मविश्वास आला. याच आत्मविश्वासाच्या बळावर राजवीरने हळूहळू आपला व्यवसाय वाढवला. २०१४ मध्ये त्याच्या दुधाची विक्री ५ लीटरवरून २२००० लीटरपर्यंत पोहोचली. तो त्याच्या जिल्ह्यातला सर्वात मोठा दूध व्यावसायिक बनला.

दूध व्यावसायिक ते फॅक्टरीचा मालक

दूध व्यवसायात मिळालेल्या पैशांची बचत करुन राजवीरने औद्योगिक परिसरात जागा घेतली. प्रयत्नांची पराकाष्टा करुन बँकेकडून कर्ज मिळवले आणि २०१५ मध्ये श्री शाम कृपा नावाने धातुविटा तयार करणारी फॅक्टरी सुरु केली. सुरुवातीला त्याच्याकडे १० लोक कामाला होते. पुढे देशातल्या एलिंगस टिएमटी, एशियन इस्पात, कॅपीटल इस्पात, राठी टिएमटी या नामांकित कंपनींना राजवीर आपला माल पुरवू लागले.

राजवीरने पुढे पाऊल टाकत कार गिअर पार्ट्स बनवणाऱ्या विश्वकर्मा व धर्मेंद्र इंडस्ट्री या अजून दोन फॅक्टरी सुरु केल्या. आज ५०० कामगार आणि ३ सीए राजवीरच्या फॅक्टरीत काम करतात.

व्यवसायाच्या सुरुवातीची सोबती सायकलपुढे जग्वार फिकी

राजवीरकडे आज कित्येक लक्झरीयस कार आहेत, मात्र आपल्या व्यवसायाला ज्या सायकलपासुन सुरुवात झाली ती सायकल आजही जपून ठेवली आहे. तिच्यासमोर आपल्या इतर गाड्या राजवीरला फिक्या वाटतात. आठवण झाली की सायकलवर बसून फिरायला त्याला आवडते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *