वयाच्या चौथ्यावर्षी साध्वी प्रज्ञा ठाकूर ही बाबरीवर चढली होती का?

सोशल मीडियावर काही गोष्टी वायरल होतात त्यामध्ये काही तथ्य असतात का हा अनेकांना प्रश्न पडतो. अशाच गोष्टीचे फॅक्ट आम्ही आपल्यासाठी शोधून काढतो. सध्या मालेगाव बॉम्बस्फोट मधील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर हिचे स्टेटमेंट आले होते. त्यात तिने 1992 साली आपण बाबरी मस्जिद च्या घुमटावर चढून तो पाडला होता असे म्हटले आहे.

यावरून अनेकांनी तिला वयाच्या 4थ्या वर्षी आपण बाबरी कशी काय पाडली असा प्रश्न केला आहे. वयाच्या 4 वर्षात कोणी बाबरी मस्जिद पाडेल का असा एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. तर पाहूया काय तथ्य आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. मालेगाव बॉम्बस्फोट आरोपी असो किंवा संघाचे नेत्याच्या खुनातील आरोपी म्हणून अटक असो अनेक बाबतीत त्या वादग्रस्त भूमिकेत राहिल्या आहेत. त्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. आणि या निवडणुकीत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो त्यांच्यावर हेमंत करकरे यांनी 9 वर्ष पोलिसी अत्याचार केला हा .. याच मुद्द्यावर लढताना त्यांनी बाबरी बद्दल ही वक्तव्य केले. त्यावरून ट्विटरवर फेसबुक वर त्यांना ट्रोल केले जाते आहे.

ट्विटर वर मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटर वर छोटा भीम शिनचॅन हे सुद्धा प्रज्ञा ठाकूर च्या बहादुरी पुढे फिके पडतील असे ट्विट केले आहे.त्यासोबत त्यांनी एक रिट्विट केले ज्यात साध्वी चा जन्म 1988 सालातील असून चौथ्या वर्षी बाबरी कशी पाडली याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. हीच गोष्ट सर्वत्र वायरल झाली आहे.

आम्ही प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जे कागदपत्रे सादर केली त्यात त्यांचे वय तपासले असता त्यात 49 वर्ष लिहिले आहे. म्हणजे बाबरी च्या वेळी त्या 4 वर्षाच्या नव्हत्या. तसेच त्यांनी 1992 साली डिग्री केली असेही नमूद केले आहे. जी काही माहिती वायरल होत होती ती पडताळणी केल्यानंतर आम्हाला चुकीची आहे असे आढळून आलीय.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *