मुलाखतीत या प्रश्नांची उत्तरे देऊन मराठी सृष्टी देशमुख आली UPSC मध्ये देशात मुलीत प्रथम !

मूळची महाराष्ट्रीयन आणि भोपाळ येथून केमिकल इंजिनिअरिंग शिक्षण घेणारी मराठी मुलगी सृष्टी देशमुख देशात मुलींमध्ये प्रथम आणि देशात पाचवी आली. UPSC च्या लेखी परीक्षेत तिला ८९५ मार्क मिळाले तर मुलाखतीत तिने १७३ गुण प्राप्त केले. मुलाखतीत तिला कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि त्याची तिने कशी उत्तरे दिली याबद्दल युट्युब चॅनेल Drishti IAS यांनी माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया…

मुलाखत पॅनलने सृष्टीला पहिला प्रश्न असा विचारला की तुम्ही नागरी सेवा परीक्षा देण्याचा विचार का केला आणि आणि तुमची निवड झाली तर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल ? याविषयी सृष्टीने सांगितले की मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल. यावर देशात शिक्षणाची काय स्थिती आहेत आणि त्यात कोणत्या समस्या आहेत असे तिला विचारले गेले. याचे सृष्टीने अत्यंत अभ्यासपूर्ण सविस्तर उत्तर दिले.

पुढचा प्रश्न सृष्टीला विचारण्यात आला की, तुम्ही फक्त २३ वर्षाच्या आहात, तुम्हाला असं वाटत नाही का की नागरी सेवांमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे वय खूप कमी आहे. तुम्हाला असं नाही का वाटत की, तुम्हाला देशाचा अभ्यास कमी आहे, अशामध्ये तुम्हाला अनुभवाची गरज आहे ?

सृष्टीला सी.डी देशमुख विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सृष्टीने सांगितले की, नागरी सेवामध्ये निवड झालेले ते पहिले भारतीय होते. १९४३ मध्ये ते भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर सृष्टीला नानाजी देशमुख यांच्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने सांगितले की, नानाजी देशमुख हे भारतातील महान व्यक्तिमत्वांपैकी एक होते. नानाजींना प्रामुख्याने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.

पुढच्या प्रश्नात सृष्टीला यावर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेल्या तीन व्यक्तींबाबत विचारले. त्यावर तिने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न मिळाल्याचे सांगून त्याच्याविषयी माहिती सांगितली. सृष्टीला योगा आणि मेडिटेशनची आवड असल्याने तिला त्याच्याशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आले. तिला विचारण्यात आले की, विपश्यना मेडिटेशन काय आहे ?

त्यानंतर सृष्टीला विचारण्यात आले की, व्यापम काय आहे आणि मागच्या काही काळात ते कशामुळे चर्चेत होते ? यावर सृष्टीने उत्तर दिले की, मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ यालाच व्यापम म्हटले जाते. परीक्षेमध्ये कॉपी आणि फसवणुकीच्या बातम्यांमुळे ते चर्चेत होते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे सृष्टीला परिस्थितीजन्य प्रश्नही विचारण्यात आला. त्यांनी विचारले की, समजा तुम्ही नागरी सेवेतून एक अधिकारी झाला आहात आणि तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल ओळखला जाता. अशा परिस्थितीत तुमच्या अत्यंत जवळचा घरातील सदस्य तुमच्या पदाचा गैरफायदा घेऊन पैसे कमवत आहे, तर अशा वेळी तुम्ही काय कराल ?

यावर सृष्टीने अत्यंत हजरजबाबीपणे सांगतले की, अशा परिस्थितीत मी आपल्या परिवारातील त्या सदस्यासोबत बोलेल, परंतु त्याने समजावूनही आलें नाही आणि माझ्या नावाचा स्वतःच्या कामासाठी गैरफायदा घेतला तर मी त्याच्या विरोधात कारवाई करे…”

अशा प्रकारे विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देऊन सृष्टीने मुलाखतीत २०० पैकी १७३ गन प्राप्त केले. त्या जोरावर ती UPSC मध्ये देशात मुलीत पहिली आणि देशात पाचवी आली.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *