हि आहेत देशातील सर्वात मोठी दहा हनुमान मंदिरे

१) बडे हनुमानजी मंदिर, प्रयागराज उत्तरप्रदेश
गंगा यमुना आणि सरवस्ती नदीच्या संगम आणि कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयागराज येथे जगातील एकमेव झोपलेल्या मुद्रेतील हनुमान मूर्ती आहे.

२) संकटमोचन हनुमान मंदिर, वाराणसी उत्तरप्रदेश
या मंदिराची निर्मिती तुलसीदासांनी केली असे मानले जाते. असं सांगतात की तुलसीदासांनी रामचरितमानस ग्रंथाचा काही भाग या मंदिराशेजारच्या पिंपळाखाली लिहला.

३) हनुमान धारा, चित्रकूट मध्यप्रदेश
चित्रकूट पर्वतात हनुमानाची विशाल मूर्ती असून तिच्या डोक्यावर पाण्याचे दोन मोठे कुंड आहेत. असं मानलं जातं की लंकादहनानंतर हनुमान आपल्या शेपटीला लागलेली आग विझवायला इथे आले होते.

४) हनुमान गढी, अयोध्या उत्तरप्रदेश
प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्याची रक्षा करण्यासाठी हनुमान इथल्या गुहेत राहायचे. इथल्या मंदिरात माता अंजनीच्या कुशीतील बाळ हनुमानाची मूर्ती आहे.

५) उलटे हनुमान मंदिर, इंदोर मध्यप्रदेश
रामायण काळातील या मंदिरात हनुमानाची उलटी मूर्ती आहे. प्रभू रामाला पाताळातून शोधून आणण्यासाठी हनुमान धरतीकडे डोके आणि आकाशाकडे पाय करून इथून पाताळात गेले होते असा समज आहे.

६) सालासर बालाजी, चुरु राजस्थान
हनुमानाच्या मूर्तीला दाढी मिशा असणारे भारतातील हे एकमेव मंदिर आहे. असं मानलं जातं की एका शेतकऱ्याला जमीन नांगरताना ही मूर्ती मिळाली होती.

७) कष्टभंजन हनुमान, सारंगपूर गुजरात
हनुमाच्या पायात स्त्री रूपातील शनिदेव अशा स्वरूपातील मूर्ती असणारे हे एकमेव मंदिर आहे. शनीच्या पीडेने ट्रस्ट असणारे भक्त इथल्या हनुमानाच्या दर्शनाला येतात.

८) यंत्रोद्धारक हनुमान, हंपी कर्नाटक
प्राचीन किष्किंधा नगरी इथेच असून पूर्वी इथेच वानरांचे विशाल साम्राज्य अस्तित्वात असल्याचे मानले जाते. प्रभू रामाची आणि हनुमानाची पहिली भेट इतेच झाली होती.

९) पंचमुखी आंजनेय स्वामी, कुंभकोणम तामिळनाडू
श्रीराम-रावण युद्धात राम-लक्ष्मणाचे अपहरण झाले तेव्हा हनुमानाने गरुड, नरसिंह, हयग्रीव, वराह आणि स्वयं असे पंचमुखी रूप घेऊन त्यांना पाताळातून सोडवून आणले अशी आख्यायिका आहे.

१०) महावीर मंदिर, पाटणा बिहार
इथल्या मंदिरात दोन स्वरूपातील हनुमान मुर्त्या आहेत. एक मूर्ती चांगल्या लोकांच्या मनोकामना पूर्ण करते तर दुरी मूर्ती वाईट लोकांचा वाईटपणा दूर करते असे मानले जाते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *