वेश्या म्हणून नंबर व्हायरल केलेल्या व्यक्तीस महिलेने अशी घडवली अद्दल!

भारतात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. समजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने आपल्यावरील अत्याचाराविरोधात बोलायला महिला घाबरतात. परंतु केरळमधील श्रीलक्ष्मी सतीश या महिलेच्या बाबतीत दोन वर्षांपूर्वी असाच एक प्रसंग घडला होता. मात्र त्या प्रसंगात श्रीलक्ष्मी यांनी जे धाडस दाखवले, त्याचे अनुकरण आजच्या महिलांनी करायला हरकत नाही. जाणून घेऊया काय आहे ही घटना…

श्रीलक्ष्मी या केरळमधील एका शिक्षणसंस्थेच्या CEO असून त्या प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना ओळखणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचा फोन नंबर व्हाटसअपवर “ही उपलब्ध आहे”, “जबरदस्त आयटम” असे लिहून व्हायरल केला. त्यानंतर श्रीलक्ष्मी यांना अनोळखी नंबरवरून कॉल यायला सुरुवात झाली.

त्यात ते श्रीलक्ष्मीला अत्यंत घाणेरडे प्रश्न विचारायला लागले. तुझा रेट काय ? मी तुला कुठे भेटू शकतो ? ३००० पुरेसे होतील का ? हॉटेलमध्ये रुम बुक करू का ? असे एक एक प्रश्न ऐकून श्रीलक्ष्मी यांनी कॉल उचलणेच बंद केले. त्यांनतर त्यांना असंख्य मेसेजेस यायला लागले. श्रीलक्ष्मीला यामुळे धक्काच बसला. त्यांना समजत नव्हते काय सुरु आहे. त्यांनी आपला फोन बंद केला.

असे दाखवले धाडस
एक तासभर हतबलपणे बसल्यावर त्यांनी या किळसवंयाप्रकाराविरोधात पाऊल उचलायचं ठरवले. त्यांनी आपला फोन चालू केला आणि ज्या लोकांनी कॉल केले होते त्यापैकी एकाला कॉल लावला. फोन उचलणारा खूप उत्साहात होता, पण श्रीलक्ष्मीने जेव्हा त्याला स्वतःबद्दल सांगितले तेव्हा झटक्यात त्याचा उत्साह भीतीत बदलला. घाबरून तो माफी मागू लागला. त्यानंतर श्रीलक्ष्मी यांनी त्याच्याकडून आपल्याविषयी अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्याचे नाव काढून घेतले. तो श्रीलक्ष्मीच्या परिचयाचाच निघाला जो समोर खूप साजुकपणे वागायचा.

अशी घडवली अद्दल

या प्रकरणातील धक्कादायक गोष्ट अशी की अफवा पसरवणारी व्यक्ती एका राष्ट्रीय पक्षाच्या युवा शाखेची सचिव होती. त्या पक्षाच्या इतर सदस्यांना जेव्हा याबद्दल समजले,तेव्हा ते श्रीलक्ष्मीसमोर पोलिसांत न जाण्याची विनवणी करू लागले. विनंती केली होती. यावर श्रीलक्ष्मी यांनी त्या व्यक्तीस पक्षातून ताबडतोब बाहेर काढण्याची अट घातली. यानंतर त्या व्यक्तीचे वडील श्रीलक्ष्मीकडे आले आणि आपल्या मुलाला क्षमा करण्याची विनंती करण्यास त्यांनी सुरवात केली.

या वृद्ध व्यक्तीची दया आल्याने श्रीलक्ष्मी यांनी त्याच्या मुलाला शिक्षा करण्याचा दुसरा मार्ग शोधला. श्रीलक्ष्मी म्हणाल्या की,जर त्यांनी अनाथाश्रमासाठी २५००० रूपये दान केले तरच मी त्याला माफ करेल. त्या व्यक्तीने श्रीलक्ष्मीची ऑफर स्वीकारली आणि अनाथाश्रमाला २५००० दान केले. त्यानंतर ही सर्व घटना श्रीक्ष्मी यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहिली होती.

श्रीलक्ष्मीच्या या धाडसी कृतीबद्दल अनेक लोकांनी त्यांचे कौतुक केले, तर काहीजण या प्रकरणात शंका घेत होते. यावर श्रीलक्ष्मी यांनी मल्याळ मनोरमा मीडियावर सांगितले की ही पोस्ट इतकी व्हायरल होईल अशी अपेक्षा तिला नव्हती. त्यांना वाटले की सादर व्यक्ती राजकारणशी संबंधित असल्याने राजकीय डावपेच वापरून आपल्याला त्रास देईल, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तिच्याकडे फेसबुकसारखा दुसरा चांगला पर्याय नव्हता. आम्हाला आशा आहे की श्रीलक्ष्मी यांची ही कथा वाचून इतर महिलाही अन्यायविरूद्ध आवाज उठवण्यासाठी प्रेरणा घेतील.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *