टिकटॉक वरून लोकं खरोखरच पैसे कमवत होते का आणि कसे ? वाचा

टिकटॉकच्या बाबतीत हा नेहमी विचारला जातो. टिकटॉकसारख्या मनोरंजनाच्या माध्यमाचा वापर करून खरोखरच लोक पैसे कमवतात का ? तर त्याचे उत्तर होय असे आहे. बहुतेकसत्य आहे.लोकांना हे खरं वाटत नाही, पण हे सत्य आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कसं कमवतात लोक टिकटॉक वरून पैसे…

१) Live.ly – टिकटॉकच्या वापरकर्त्यांसाठी Live.ly हे एक स्ट्रीमर ऍप्लिकेशन आहे. याचा वापर करून युजर्सनी आठवड्यात हजारो डॉलर कमवले आहेत.

२) पेड प्रमोशन – टिकटॉकवर प्रसिद्ध असणाऱ्या लोकांना त्यांच्या व्हिडीओमध्ये विविध प्रकारच्या ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी पैसे दिले जातात. थोडक्यात टीव्हीजर जशा जाहिराती दाखवल्या जातात त्याच जाहिरातीतील गोष्टी टिकटॉकच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी पेड प्रमोशन केले जाते.

३) इंस्टाग्राम – टिकटॉक वापरकर्त्याचे व्हिडीओ पाहणारे बरेचशे लोक त्या वापरकर्त्याला इंस्टाग्रामवरही फॉलो करत असतात. वापरकर्त्याला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करण्यासाठीही जाहिरातदार भरपूर पैसे देतात.

४) भेटवस्तू – कधी कधी तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नसते. विविध ब्रँड्स त्यांच्या नावाचा उल्लेख करणाऱ्या टिकटॉक वापरकर्त्याला आपल्या ब्रँड्सच्या भेटवस्तू पाठवतात. यातून युजर्सला ते हे दर्शवितात की आम्ही तुमच्या योगदानाबद्दल किती कृतज्ञ आहोत.

५) पार्टीत गेस्ट – विविध रेस्टोरंटस आणि तत्सम शॉप आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टिकटॉकवर प्रसिद्ध असणाऱ्या युजर्सना निमंत्रण देतात. याद्वारे ते युजर्सला चांगले मानधनही देतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *