प्रचारापेक्षा अपघातग्रस्ताचे प्राण वाचवायला दिले पार्थ पवारांनी महत्व, लोकांकडून कौतुक !

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना गेल्या काही दिवसांपासून आपले अडखळत केलेले पहिलेवहिले भाषण, ख्रिश्चन पाद्रीचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ, मंदिरात गणपतीच्या मुर्तीला हार घालत असताना पायात सॉक्सला बूट असल्याचे सांगत झालेला अपप्रचार अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळे सोशल मिडीयावरच्या नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले होते.

परंतु अशा ट्रोल, देव-धर्म अपप्रचार याच्यापलीकडे दुर्लक्ष करत आपल्या प्रचारात व्यस्त असणाऱ्या पार्थ पवारांच्या प्रसंगावधानाचे नुकतेच एक उदाहरण पाहायला मिळाले, ज्यामुळे एका अपघातग्रस्त युवकाचे प्राण वाचले.

पार्थ पवार हे उरण परिसरात आपला प्रचार करत होते. त्या भागातील ११ गावांच्या नियोजित प्रचारदौऱ्यासाठी पार्थ पवार बाहेर पडले. निवडणूका होई पर्यंत एक एक क्षण महत्वाचा असतो. न्हावे खाडी या गावी प्रचारासाठी निघाले असताना रस्त्यात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघातग्रस्त दुचाकीस्वार रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे पाहून पार्थ पवारांनी आपला ताफा थांबवला. तोपर्यंत लोकांनी गर्दी केली.

पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिस आल्यानंतर पार्थ पवारांनी त्वरेने त्या जखमी युवकाला नेरुळच्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली. ट्रकचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले गेले.

दरम्यान त्या ११ गावातील लोक पार्थ पवार येत नाहीत म्हणुन वैतागले होते. परंतु त्यांना घडलेली घटना समजताच न्हावे खाडी परिसरातील लोक पार्थ पवारांचे आभार मानून त्यांचे कौतुक करत आहेत. प्रचार, गाठीभेटी, निवडणुक होत राहतात, पण माणुसकी जपणारे प्रसंग, लोकप्रतिनिधी लक्षात राहतात. पार्थ पवारांच्या रूपाने पवारांच्या घरातील पुढची पिढी तो वारसा चालवताना दिसत आहे.

असल्या तप्त उन्हात जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाला मदतीचा हात देऊन पार्थ पवार आपल्या पुढच्या प्रचाराला निघून गेले. सोशल मीडियावर ट्रोल करणारे ट्रोल करत राहतील, पण त्यांच्या चांगल्या कामाचे तितक्याच खुल्या दिलाने कौतुकही करता आले पाहिजे.

अपघातग्रस्ताला मदत करतानाचा व्हीडिओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *