भाजप आमदाराने पाकिस्तानी सैन्याचे गाणं चोरले, बदल करुन केले भारतीय सैन्याला अर्पण ?

रामनवमीच्या दिवशी प्रचंड मिरवणुक काढुन देशाचे लक्ष वेधणारे भागानगर म्हणजेच हैदराबादचे आमदार व प्रखर हिंदुत्ववादी नेते टी.राजासिंह हे त्यांच्या तिखट शैलीतील भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. हैद्राबादमध्ये चालणारे ओवेसी बंधूंसोबतचे त्यांचे शाब्दिक युद्ध माहित असल्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी लोक त्यांच्या सभांना मोठी गर्दी करतात. अशा या भाजप आमदारांच्या बाबतीत नुकताच एक किस्सा घडला आहे. पाकिस्तानी सैन्याचे “पाकिस्तान जिंदाबाद” हे गाणे चोरुन टी.राजासिंह यांनी त्यात थोडासा बदल केला आणि स्वतःच्या आवाजात गाऊन ते भारतीय सैन्याला अर्पण केले, असा दावा पाकिस्तानी आर्मीने केला आहे. जाणुन घेऊया हे प्रकरण…

भाजपचे हैद्राबादच्या गोशामहलचे आमदार टी.राजासिंह यांनी आपल्या “चौकीदार राजा सिंह” नावाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरती १२ एप्रिलला एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात ते स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेले “हिंदुस्तान जिंदाबाद” गाणे गाताना दिसत आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “माझे हे नवीन गाणे रामनवमी निमित्त १४ एप्रिल यादिवशी ११;४५ वाजता रिलीज होईल, हे गाणे भारताच्या सैन्यदलाला अर्पण आहे.”

आमचं गाणं चोरलं : पाकिस्तान आर्मीचा दावा

टी.राजासिंह यांनी ऐकून १ मिनिट ५ सेकंदाचा जो व्हिडीओ अपलोड केला होता त्यावरुन हे गाणे आपलं असल्याचा दावा पाकिस्तानी आर्मीने केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “हे गाणं २३ मार्चच्या पाकिस्तान दिनानिमित्त २१ मार्च रोजी प्रसारित करण्यात आलं असुन ते गाणे पाकिस्तानचे प्रसिद्ध लेखक साहीर अली बग्गा यांनी लिहलेले होते. या मुळच्या गाण्यामध्ये आमदार टी.राजासिंह यांनी थोडाफार बदल करुन भारताच्या सैन्याला अर्पण केले.

” मुळच्या गाण्यातील “पाकिस्तान जिंदाबाद” ऐवजी “हिंदुस्थान जिंदाबाद” असा बदल केल्याचा आरोप पाक आर्मीने केला आहे. पाकिस्तानी आर्मीचे प्रवक्ता मेजर जनरल असिफ गफुर यांनी १४ एप्रिल रोजी आपल्या स्वतःच्या ट्विटर हॅन्डल वरुन आमदार टी.राजासिंह यांच्या संबंधित ट्विटला रिट्विट करुन “आमचे गाणे कॉपी केले याचा आनंद आहे, पण त्याचसोबत खरे बोलण्याची सुद्धा कॉपी करा.” असा टोमणा त्यांनी मारला आहे.

काय आहे वास्तव ?

खरोखर पाकिस्तान सैन्याचे गाणे कॉपी केले आहे का ? असिफ गफुर खरं बोलत आहेत की आमदार टी.राजासिंह ? यासाठी तपासुन पहिले असता युट्युबवर ISPR Official Song नावाचा एक व्हिडीओ मिळाला. त्या गाण्याला तीन आठवड्यात आतापर्यंत ६८ लाख हिट्स मिळालेल्या दिसत आहेत. ते गाणे आणि आमदार टी.राजासिंह यांनी गायलेले गाणे यातील जवळपास शब्द आणि संगीत सारखंच असल्याचं दिसत आहे.

बघा व्हिडीओ

पाकिस्ताननेच आमचं गाणं कॉपी केलं : आमदार टी.राजासिंह यांचे तोडकंमोडकं उत्तर

आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना १४ एप्रिललाच टी.राजासिंह यांनी दुसरा एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात त्यांनी सांगितले की, “पाकिस्तानी मिडीया माझं ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ गाणं दाखवतेय हे पाहताना मला छान वाटत आहे.एक दहशतवादी राष्ट्र चांगले गायकही तयार करत असल्याचं पाहुन मला आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही २०१० पासुन रामनवमीला श्रीराम आणि देशासाठी नवनवीन गाणी तयार करतो. आमच्या भारतात एकाहुन सरस गायक आहेत. त्यामुळे पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्राकडून आम्हाला काहीही कॉपी करण्याची गरज नाही,पाकिस्तानी गायकांनीच कदाचित माझे गाणे कॉपी केले असेल.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *