पाकिस्तानातुन आलेल्या महिलेने ३०० पासुन सुरु केला व्यवसाय, आज आहे ७०० कोटींची उलाढाल !

बेकरी, स्नॅक्स आणि आईसक्रीम बनवणाऱ्या “क्रिमिका” या ब्रँड बद्दल आपण ऐकलेच असेल. रजनी बेक्टर नावाच्या महिला त्या कंपनीच्या मॅनिजींग डायरेक्टर आहेत. नाममात्र ३०० रुपयांचे भांडवल वापरून त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला होता. आज या कंपनीची वार्षिक उलाढाल ७०० कोटींच्या घरात आहे. आपल्या छंदाला व्यवसायाचे रुप देणाऱ्या रजनी आज फास्ट फूड इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ्या फूड सप्लायर म्हणून रओळखल्या जातात. जाणून घेऊया त्यांच्या व्यावसायिक वाढीचा प्रवास…

पाकिस्तानच्या कराची येथे जन्मलेल्या रजनी बेक्टर यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत आले. लुधियानाच्या एका व्यावसायिक कुटुंबात रजनींचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या पाककलेचा छंद जोपासण्यासाठी पंजाब कृषी विद्यापीठातून पाकशास्त्र कोर्स पूर्ण केला.

अशी झाली व्यवसायाला सुरुवात

रजनी आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी केक,कुकीज किंवा आईसक्रीम बनवायच्या. त्यांच्या हातची चव पाहून घरी येणारे सर्व नातेवाईक त्यांचे भरभरून कौतुक करायचे. असेच सत्तरच्या दशकातील एका दिवाळीच्या यात्रेत रजनींनी एक फूडस्टॉल लावला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहून त्यांनी व्यवसायात उडी घेतली. सुरुवातीला कुकिंगसाठी ३०० रुपयांची उपकरणे आणली आणि स्थानिक यात्रांमध्ये आपले फूड स्टॉल लावायला सुरुवात केली.

त्यातून त्यांना उत्पन्नाचा स्रोत मिळाला. त्यानंतर १९७८ मध्ये रजनींनी लुधियानातील जीटी रोडवर २०००० रुपये भाड्याने आईसक्रीम आणि पुडिंग निर्मिती सुरु केली. त्यांनी लवकरच ब्रेड आणि बिस्कीटही बनवायला सुरुवात केली. आपल्या ब्रँडला त्यांनी “क्रिमिका” नाव दिले आणि “क्रिमिका फूड्स प्रायव्हेट लिमिटेड” नावाने कंपनी सुरु केली.

व्यावसायिक यश

घरच्या किचन पासून सुरु झालेला छंद एका छोट्या दुकानात आणि तिथून एका भव्य फॅक्टरीमध्ये परावर्तित झाला. आज त्याची कंपनी मॅक्डॉनल्ड्ससह १५ ब्रँड्सला आपलए फूड सप्लाय करते. त्यांच्या कंपनीचे एकूण टर्नओव्हर ७०० कोटी रुपये झाले आहे. रजनी बेक्टर यांची कंपनी आज मॅकडोनाल्ड सोबतच सुपर बाजार, बिग बजार, विशाल मेगामार्ट, रिलायन्स पिझ्झा हट, कॅफे कॉफी डे, बरिस्ता, पॉप जॉन्स, जेट एअरवेज आणि इंडियन रेल्वे यांनाही आपला माल पुरवते. रजनी बेक्टर देशातील सर्वात मोठ्या फूड सप्लायर बनल्या आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *