हृदयविकाराचा झटका आल्यास लगेच करा ही पाच कामे

हृदयविकाराचा धक्का आल्याच्या आजकाल असंख्य घटना घडत असल्याचे आपण बघतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे पुरेशे लक्ष न दिल्यामुळे यामध्ये वाढ होत आहे. हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढले आहे. अगदी कमी वयात देखील हृदयविकाराचा धक्का अनेकांना येत आहे. हृदयविकाराचा धक्का आल्याचे वेळीच ओळखणे हे त्यावरील उपाययोजना व उपचार या दृष्टीने आवश्यक आहे. त्यादृष्टीने हृदयविकाराच्या धक्क्याची लक्षणे ओळखणे आवश्यक आहे.

दृष्टीने हृदयविकाराच्या धक्क्याची लक्षणे ओळखणे आवश्यक आहे. हृयविकाराचा धक्का येतो त्यावेळी छातीत दुखायला लागतं, उलटी किंवा मळमळ, चक्कर येणं, छाती जड वाटणं, दम लागणं, घाम येणं, कोरडा खोकला आणि अस्वस्थता या गोष्टी घडतात.

जर तुमच्या घरी कोणालाही हृदयविकाराचा झटका आला तर घाबरून न जाता पाच मिनिटांच्या आतच हे पाच काम जरूर करा, यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो.

1. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला उलटी किंवा मळमळ आल्यासारखी वाटते. अशातच रुग्णाला एका बाजूने वळवून उलटी करण्यास लावा. असे केल्यास फुप्फुसांना नुकसान होणार नाही.

2. रुग्णाच्या मानेच्या बाजूने हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर पल्स ६०-७० पेक्षा कमी आहे, तर समजून घ्या की रक्तदाब गतीने वाढत आहे आणि रुग्णाची तब्येत नाजूक आहे.

3. पल्स रेट जर कमी-जास्त होत असेल तर रुग्णाला झाेपवून त्याच्या पायाला वर उचला. यामुळे पायाचा रक्तप्रवाह हृदयाच्या बाजूने सुरू होईल आणि रुग्णाला आराम मिळेल.

4. रुग्णाला सरळ झोपवा आणि त्याच्या कपड्यांना सैल करा. यामुळे त्याची बेचैनी थोडी कमी होईल. हालचाल करू नये. स्वतः चालत जाण्याचा प्रयत्न करू नये. जिने चढणं आणि उतरणं करू नये. स्वतः गाडी चालवू नये.

5. रुग्णाला गराडा घालू नका. त्याच्या आजूबाजूला वारा येऊ देण्यासाठी जागा सोडा, त्यामुळे त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळेल. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घ्याव्यात.

आणि महत्वाची गोष्टी म्हणजे रुग्णवाहिका ताबडतोब बोलवावी. आजकाल सर्व रुग्णवाहिकांमध्ये हृदयविकाराची सेवा तातडीने उपलब्ध असते. त्याबरोबर डॉक्टरही असतात. जवळच्या, आधुनिक अद्ययावत सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *