१००० किमीवरून अंडे देण्यास आली, परंतु तिथे विकास झाला होता

दिवसान दिवस जग पुढे चालले आहे. प्रगती होत आहे परंतु या सर्व प्रगतीमध्ये निसर्गाच्या हानी कडे लक्ष देण्यास मनुष्य प्रजाती तयार नाही आहे. असाच काही अनुभव फेसबुकवर बघायला मिळाला आहे. कबीर संजय एक लेखक आहे त्यांनी हि पोस्ट केलेली आहे पोस्ट हिंदीमध्ये आहे. परंतु आपल्याला नक्की समजेल तिचा अर्थ नेमका काय आहे तो,

त्यांच्या पोस्टचा मराठी अनुवाद खालील प्रमाणे आहे,
यु-टर्ण
ह्या फोटोला निरखून बघा माणसाची उत्क्रांती इथून वापस जात आहे. हा फोटो मालदीव मधील माफारू या बेटाचा आहे. हा हिरवा समुद्री कासव आहे. तो हजारो किमी प्रवास करत इथे अंडे द्यायला आला. परंतु त्याची पिढ्यान पिढ्या अंडे देण्याची जी जागा आहे तिथे तर विकास झाला आहे विमानतळाचा रनवे बनलेला आहे. आता काय करावे ?

हिरवा समुद्री कासव हा विलुप्त होण्याच्या काठावर आहे. म्हणजे काही दिवसात हा प्राणी आपणास दिसणार नाही. जिथे या कासवांचा जन्म होतो तिथेच ते अंडे देण्यास परत येतात. माफारू बेट हे कासवाचे अंडे देण्याची जागा आहे. इथेच यांचा जन्म झाला होता. त्यानंतर हजारो किमीचा समुद्र पार करत तो तिथे अंडे देण्यास आला. परंतु मागील वर्षी तिथे युएई मधून ६० मिलियन डॉलर घेऊन इथे विमानतळ बनविण्यात आले.

कासवाने रनवेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि मध्येच अंडे त्त्यांनी दिले आणि परत गेला. या आईने अंडी दिली परंतु पिले परत येणार नाही याचा विचार करून त्याला किती दुख झाले असेल ? असच सुरु राहील तर काही दिवसाने हा कासव आपणास दिसणार नाही. अस वाटत आहे कि उत्क्रांतीने यु टर्न घेतला आहे. (फोटो स्वतंत्र पोर्टलवरून घेण्यात आला आहे)

आता विषय राहिला कि हा फोटो फेसबुकचा आहे तिथे अनेक फेक गोष्टी पसरविण्यात येतात परंतु आम्ही त्याची माहिती घेतली असता हि माहिती खरी आहे खाली दिलेल्या काही प्रतिष्ठीत पेपरच्या बातम्या आहे.
Down To Earth Portal:- Female turtle returns to Maldivian atoll to lay eggs, finds runway instead

The Edition:- Turtle steals maiden landing on Maafaru runway

The Insider:- An endangered turtle returned to the beach to lay her eggs, only to discover an airport runway had been built

The Independent Co Uk Endangered turtle returns to beach to lay its eggs only to find runway has been built

आपल्याला हि माहिती आवडल्यास आणि पर्यावरणाची काळजी असल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *