हेच ते बीएस पाटलांचं भाषण ज्यामुळे अमळनेरमध्ये भाजप मेळाव्यात झाली हाणामारी..

जळगाव येथे झालेला भाजपचा मेळावा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे. बी एस पाटील आणि वाघ समर्थक असे भिडले कि त्याचा प्रत्यत गिरीश महाजन यांना चांगल्या प्रकारे आला आहे. वाघ समर्थकांनी आरोप केला आहे कि बी एस पाटील यांनी खालच्या पातळीवर स्मिता वाघ याच्यावर टीका केल्याने हा प्रकार घडला.

याचा आम्ही शोध घेतला आहे कि नेमकी काय टीका झाली होती. जळगाव लोकसभेचा भाजपच्या उमेदवारीचा घोळ झालेला बघायला मिळाला होता. भाजपचे तिकीट अगोदर स्मिता वाघ यांना देण्यात आले होते. त्यानंतर तिथे उमेदवार बदलण्यात आला. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आले.

यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद जळगाव जिल्ह्यात बघायला मिळाले होते. तसेच भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार ए टी पाटील यांचे देखील तिकीट कापण्यात आले होते. आज झालेल्या या मारहाणीने भाजपमधील अंतर्गत वाद हा कोणत्या टोकाला गेला आहे हे दिसते.

डॉ. पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर १९९५ पासून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. डॉ.बी.एस.पाटील हे लोकसभा निवडणूक लढण्यास देखील इच्छुक होते.

भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी विधानपरिषद आमदार स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले होते. जेव्हा भाजपाचे खासदार एटी पाटील यांना तिकीट मिळालं नाही, तेव्हा पारोळा शहरात एटी पाटील यांनी एक सभा घेतली होती, त्या सभेत बीएस पाटील यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात टीका केली होती.

या सभेमध्ये ते काय बोलले हे तुम्हीच बघा

नाथा भाऊचे पाय व डोक दोघ नवरा बायको दाबतात आता महाजनांचे पण दाबत आहे आणि असल्या काही जहरी टीका झाल्यामुळे हा प्रकार घडला. या सर्व गोष्टीमुळे वाघ समर्थक चिडले आणि मा. आमदार महोदयांना चांगलाच प्रसाद दिला आहे. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *