चौकीदार आणि दरबान मधील फरक आपणास माहिती आहे का ?

सध्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती चौकीदार या शब्दाची अनेक लोकांनी नावा समोर चौकीदार लिहण्यास सुरवात झाली. याचे कारण राहुल गांधी यांनी केलेले “चौकीदार चोर है” हा आरोप आणि त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदि जे स्वतःला प्रधानमंत्री नाहीतर चौकीदार म्हणा असे बोलतात त्यांच्या समर्थनात हे लोक आले होते.

आता आपण चौकीदार आणि दरबान यामधील फरक जाणून घेऊया कारण दोघेही चौकीदाराचे काम करतात परंतु काम करण्याची पद्धत वेगळी आहे. चौकीदार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळेल तो सध्या सोसायटी मध्ये देखील राहतो. तिथे येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करणे, काम विचारणे, त्याची नोंद ठेवणे आणि रात्री व दिवसा वेळेस त्या ठिकाणची सुरक्षा ठेवणे हे चौकीदाराचे काम आहे. चौकीदार चाणाक्ष असणे गरजेचे आहे नाहीतर त्या ठिकाणी चोरांचा मोठा धोका असतो.

परंतु दरबानचे काम या पेक्षा उलट आहे. दरबान हा अंगाने चांगला मोठा असतो, भारदस्त शरीरयष्टी, पिळदार अश्या मिश्या आणि अंगावरील कपडे देखील लोकांचे लक्ष आकर्षित करतील असे राहतात. परंतु दरबान हा सामान्य ठिकाणी आढळत नाही तो असतो धन दांडग्याच्या दारावर, ५ स्टार हॉटेलच्या दारावर देखील असतो. एअर इंडियाचा दरबान तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

पुरातन काळात द्वारपाल शहराच्या वेशीजवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सेवा करत. परंतु सध्या हे दरबान किंवा द्वारपाल एक शोभेची वस्तू झालेले आहेत. मध्ये येणारा किंवा जाणारा कोणीही असो मग तो चोर असो का कोणीही दरबान त्याचे स्वागत हास्याने करतो. त्याच्यासाठी दरवाजा उघडतो आणि झुकून प्रणाम करतो.

त्यामुळे चौकीदार आणि दरबानमध्ये किती मोठा फरक आहे हे आपणास कळलें असेलच. चौकीदार खाकी कपडे वाला अंगापिंडात साधारणच असतो परंतु आपले काम तो चोख बजावतो. दरबान देखील आपले काम चोख बजावतो परंतु त्याचे कामच कोणीही यावे किंवा जावे त्यांचे हसून स्वागत करणे आहे. आणि प्रत्येका समोर या भारदस्त शरीरयष्टीच्या माणसाला झुकावे लागते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील विशेष माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *