१९६७ पासून आजपर्यंत शिवसेनेच्या प्रचंड गाजलेल्या जुन्या घोषणा

बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभोधनाची परंपरा असणाऱ्या घरात 23 जानेवारी 1927 ला पुणे येथे जन्म झाला. बाळासाहेब ठाकरे हे सुरुवातीला एक सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. 1950 ला टाइम्स ऑफ इंडियाच्या संडे एडिशनला त्यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध व्हायचे. 1960 मध्ये बाळासाहेबांनी ती नोकरी सोडली.

बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1960 मध्ये मार्मिक साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे मार्मिक नाव बाळासाहेबांना प्रभोधनकार ठाकरे यांनी सुचवले होते. पहिल्या अंकाचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मार्मिक हे मराठीतील पहिलेच व्यंगचित्र साप्ताहिक ठरले.

त्यांनी याच मार्मिकच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही हे त्यांनी हेरले. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. ‘हर हर महादेवची’ गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा अशी बाळासाहेबांची भावना होती.

एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव….शिवसेना….यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली.

शिवसेनेच्या या जुन्या घोषणा प्रचंड गाजल्या-

१९६७ पासून शिवसेनेची प्रचारशैली खास राहिली आहे. आपल्या लेखणीच्या जीवावर मराठी माणसाला एकत्र आणून महाराष्ट्रातील सगळ्या राजकारणाचं चित्रंच बाळासाहेबांनी बदललं होतं. १९६८ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. १२ मार्च १९६८ रोजी निवडणूक होणार होती. पण होळीचा सण आल्याने मुंबईतील कामगार मोठ्या प्रमाणावर गावी जात असतं. बाळासाहेबांनी या निवडणुकीच्या तारखेला विरोध केला आणि हि निवडणूक २६ मार्चला झाली. या निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत यश मिळवले.

तेव्हा शिवसेनेने दिलेली घोषणा घरोघरी पोहचली होती. ती घोषणा होती, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते’. मुंबईतील अनेक भिंती या घोषणेने रंगल्या होत्या. हि घोषणा त्यावेळी खूप गाजली. याशिवाय ‘बुंद जो बन गए मोती शिवसेना हमारी साथी’ हि त्यातलीच एक घोषणा.

या घोषणा तयार करण्यामध्ये पुण्यातील कार्यकर्ते पुढे असायचे. त्यांनी तयार केलेल्या घोषणा राज्यभर फिरायच्या. कोणी पक्षांतर केलं कि ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे‘ हि घोषणा शिवसेनेचीच. शिवसैनिकांची हि घोषणा आजही वापरली जाते. ‘कृष्णा मिळाली कोयनेला आपण मिळू शिवसेनेला‘ हि घोषणा पुणेकरांच्या आजही लक्षात असेल.

‘हटाव लुंगी बजाव पुंगी’ या घोषणेने तर मोठ्या प्रमाणावर माणसं रस्त्यावर आली. दक्षिण भारतीयांच्या विरोधातील हे अभियान चांगलंच गाजलं होतं. कालचा मद्रासी आज तुपाशी हि मार्मिकची त्यावेळची हेडलाईन होती. रिमोट कंट्रोल सारखं हे सरकार चालवेल हे बाळासाहेबांचं विधान चांगलंच गाजलं होतं. बऱ्याच प्रमाणात त्यांनी हे करून पण दाखवलं होतं. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला हि घोषणा देखील आजही मोठ्या प्रमाणावर दिली जाते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *