ऑस्ट्रेलिया विरुद्ध ७ वर्षा अगोदर कॅप्टन कुल धोनी जेव्हा अम्पायरवर चिडला होता..

धोनीला राग कदाचितच येतो त्यामुळे लोक त्याला कॅप्टन कुल म्हणून सगळे लोक त्याला ओळखतात परंतु काल सामन्यात त्याचा राग अनेकांनी बघितला. राजस्थान विरुद्ध या सामन्यात धोनी चर्चेत राहीला कारण होते एक नो बॉल जो अम्पायरने दिला आणि धोनीने परत मैदानात येऊन बाचाबाची केली तेव्हा तो बॉल लीगल धरण्यात आला.

बाद झाल्यानंतर धोनी मैदानात आला आणि त्याने पंचांना सुनावले यामुळे त्याला दंड देखील भरावा लागला आहे. सामन्याचे देण्यात येणारे ५०% मानधन कापण्यात येणार आहे. गोष्ट शेवटच्या ओव्हरची आहे जेव्हा चेन्नईला जिंकायला १८ रन ची गरज होती. ओव्हरच्या चौथ्या चेंडू ला बेन स्टोकने योर्कर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तो फ़ुल-टॉस गेला. फ़ुल-टॉसपण असा कि नॉन स्ट्राईक ला असलेल्या पंचाला तो नो बॉल वाटला आणि त्यांनी नो बॉल सांगितला. मैदानावर नो बॉलचा सायरन देखील वाजला. परंतु त्यांनी जेव्हा लेग अम्पायर ब्रूस ऑग्ज़ेनफ़ोर्ड कडे बघितले तेव्हा त्यांनी नो बॉलचा सिग्नल दिला नाही. कारण उंचीवर असलेल्या बॉलला नो बॉल ठरविण्याचा अधिकार फक्त लेग अम्पायर असतो. त्यामुळे नंतर हा निर्णय उल्हास गंधे यांना बदलवायला लागला.

चेन्नई ला २ बॉल मध्ये ६ रन हवे होते आणि एक फ्री हिट मिळत होता म्हणून धोनी चिडला आणि मैदानात आला जेव्हा त्याला नियम सांगण्यात आला तेव्हा तो परतला परंतु आयपील आर्टिकल 2.20 लेवल २ चा नियम त्याने तोडल्याने त्याला दंड देखील करण्यात आला आहे. हि झाली गोष्ट २०१९ ची असाच एकदा राग धोनीला आला होता २०१२ मध्ये जेव्हा अंतराष्ट्रीय एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलिया येथे खेळल्या गेला. २९ व्या ओव्हर मध्ये रैना बॉलिंग करत असताना हसीचा चेंडू सुटला आणि धोनीने मागू विकेट उडविल्या.

निणर्य थर्ड अम्पायर कडे देण्यात आला. आणि थर्ड अम्पायर नि आउट चा निर्णय दिला आणि थोड्या वेळातच असे कळले कि अम्पायर कडून चुकीचे बटन दाबण्यात आले आहे. त्यानंतर धोनीचा पार चढला आणि ते अम्पायर कडे गले या सर्व घटनेचे चित्रीकरण आपण खालील व्हिडीओ मध्ये बघू शकता.

माणसा कडून चुका होतात असच काही या दोन्ही घटनेत झाले आहे. हे आपण बघु शकता. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *