राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वी कोण होते ?

राहुल गांधी आज ज्या पद्धतीने नेता म्हणून समोर आले आहेत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना बरेच थांबावे लागले आहे. ते आज ४८ वर्षांचे असून काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. घरात इतके राजकीय वातावरण असताना राहुल गांधी लहानपणापासून राजकारणापासून दूर राहिले ते अगदी तरुणपणापर्यंत ! त्यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी राजकारणात केला. राजकारणात येण्यापूर्वीच्या राहुल गांधींबद्दल जाणून घेऊया.

एक राजकीय वारस

राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या पोटी झाला. ते नेहरू-गांधी कुटुंबच्या चौथ्या पिढीतील आहेत. त्यांची आजी इंदिरा गांधी या तत्कालीन पंतप्रधान होत्या. ते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नातू आहेत.

सुरुवातीचे शिक्षण

राहुल गांधींनी १९८१ ते १९८३ या काळात उत्तराखंडच्या देहरादूनमधील The Doon School मध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांनी कोलंबिया स्कूल, दिल्ली येथे शिक्षण घेतले. राजीव गांधी सुद्धा The Doon School चे विद्यार्थी होते.

इंदिरा गांधी यांची हत्या

१९८४ मध्ये त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. सुरक्षा धोक्यांमुळे राहुल आणि त्यांची बहीण प्रियांका यांना १९८९ पर्यंत घरीच शिक्षण घ्यावे लागले.

कॉलेज जीवन

१९८९ मध्ये त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये त्यांच्या अंडरग्रॅज्युएट शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांनी क्रीडा कोट्यातुन कॉलेजमध्ये प्रवेश केला. १९९० मध्ये अर्थशास्त्र शिकण्यासाठी ते हार्वर्ड विद्यापीठात गेले.

राजीव गांधी यांची हत्या

१९९१ मध्ये एका निवडणूक रॅलीदरम्यान LTTE या संघटनेने राजीव गांधींची हत्या केल्यावर राहुल गांधींनी सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेच्या फ्लोरिडातील रोलिन्स कॉलेजमध्ये स्थानांतर केले आणि १९९४ मध्ये बीए पदवी प्राप्त केली.

द राहुल विन्सी कोड

पुढे १९९५ साली ते केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये विकास अध्ययनात एमफिल करण्यास गेले. तिथे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना राहुल विन्सी असे नाव धारण करून शिकावे लागले. जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांनी सुद्धा ट्रिनिटी येथे पदवीचे शिक्षण घेतले होते.

सामान्य माणसासारखे कामी केले

पदवीधर झाल्यावर राहुल गांधी यांनी लंडनमधील मॉनिटर ग्रुप या मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्ममध्ये तीन वर्ष काम केले. मॉनिटर ग्रुपची स्थापना मॅनेजमेंट गुरु मायकेल पोर्टर यांनी केली होती. २००२ मध्ये ते मुंबईस्थित टेक्नोलॉजी आउटसोर्सिंग फर्म बॅकोप्स सर्व्हिसेस प्रा.लि. चे संचालक होते.

राजकीय मंचावर पाऊल

मार्च २००४ मध्ये राहुल गांधींनी आपल्या वडिलांच्या मतदारसंघातून म्हणजे उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवली. विदेशी मिडीयासोबत झालेल्या पहिल्या मुलाखतीत त्यांनी स्वत:ला देशाचा एकनिष्ठ म्हणून चित्रित केले आणि त्यांनी भारतातील “विभाजनात्मक” राजकारणाची निंदा केली. ते जात आणि धार्मिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतील असे राजकारणात प्रवेश करताना त्यांनी सांगितले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *