आता आला अनोखा कंडोम, दोघांची सहमती असेल तरच उघडेल कंडोमचे पाकीट !

अर्जेंटिनाच्या सेक्स खेळणी तयार करणाऱ्या Tulipan नावाच्या एका कंपनीने नुकताच एक अनोखा कंडोम लॉन्च केला आहे. सेक्स करण्यासाठी जर दोघा पार्टनरची एकमेकांना सहमती असेल तरच या कंडोमचे पाकीट उघडून त्यांना सेक्सचा आनंद घेता येईल,अन्यथा त्यांना सेक्सच करण्यासाठी कंडोम वापरता येणार नाही. नेमका कसा आहे हा अनोखा कंडोम ? तो कसा वापरायचा आणि तो बाजारात कधी येईल ? चला तर मग जाणून घेऊया…

अर्जेंटिनाची ट्युलिपॅन ही कंपनी सेक्स खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्यांना सेक्स पार्टनर नाही ते लोक अशी खेळणी वापरून आपली शारीरिक गरज पूर्ण करत असतात. परंतु जेव्हा सेक्ससाठी पार्टनर उपलब्ध असेल तेव्हा गोष्ट वेगळी. परंतु कधीकधी दोघांपैकी एखाद्या पार्टनरची सेक्स करण्याची इच्छा नसते, मात्र अशावेळी जबरदस्तीने सेक्स केला जातो. विशेषतः महिलांच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात घडते. दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत. त्या रोखायच्या कशा यासाठी ट्युलिपॅन नामी शक्कल लढवली आहे. ही कंपनी सातत्याने सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जनजागृती करते.

कसा आहे हा अनोखा कंडोम ?

ट्युलिपॅन कंपनीने लॉन्च केलेल्या आपल्या कंडोमला PLACER CONSENTIDO असे नाव दिले आहे. त्याचा अर्थ “सहमतीने आनंद” असा आहे. त्या कंडोमच्या पाकिटावर “जर होकार नसेल, तर तो नकारच” अशी एक स्पॅनिश भाषेतील टॅगलाईन लिहिली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की पार्टनरच्या सहमतीशिवाय हा कंडोम वापरता येणार नाही. तुम्ही म्हणाल असं कसं ? तर ते असं की, ज्यात हे कंडोम आहेत त्याच पाकीट तुम्ही तुमच्या दोन हातांनी उघडायला गेलात तर तुम्ही ते शकत नाही.

कारण या पाकिटाची रचनाच अशी केली आहे की पाकीट उघडण्यासाठी तुम्हाला चार हातांची आवश्यकता लागते. या पाकिटाच्या सहापैकी चार बाजूंवर दोन-दोन बटणांचे वेगवेगळे पॉईंट आहेत. एकूण आठ बटणे आहेत. एका पार्टनरने चार बटनांवर दाब दिल्यानंतरच उरलेली चार बटणे बाहेर येतात. दुसऱ्या पार्टनरने ती चार बटणे दाबल्यावरच मग कंडोमचे पाकीट उघडले जाईल. जर दुसऱ्या पार्टनरची सेक्सची इच्छा नसेल तर तो बटन दाबणार नाही आणि कंडोम वापरता नाही. एड्ससारख्या भयंकर आजाराच्या भीतीने विनाकंडोम कुणी सेक्स करत नसल्याने या कंडोममुळे सहमतीशिवाय सेक्स करता येणार नाही.

हा कंडोम बाजारात कधी उपलब्ध होईल ?

ट्युलिपॅनने आपल्या कंडोमच्या ब्रँडच्या वापराबाबत ट्विटर अकाउंटला व्हिडीओ शेअर केला आहे. ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत हा कंडोम बाजारात विक्रीला येण्याची शक्यता आहे. ट्युलिपॅन सध्या आपल्या कंडोम प्रमोट करण्यासाठी तसेच चाचणी म्हणून अनेक बार, हॉटेल, पार्ट्यांमध्ये कंडोम मोफत वाटत आहे. सोशल मीडियावर गाजलेल्या #MeToo या कॅम्पेनिंग नंतर असा कंडोम तयार करण्याचा विचार कंपनीने केला. सध्या सोशल मीडियात हा कंडोम चांगलाच गाजत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *